AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Technology : मोबाईल वारंवार पाॅवर बँकने चार्च करणे किती सुरक्षीत? नवीन माहिती आली समोर

पॉवर बँकेबाबत अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, ती वापरल्याने बॅटरी खराब होते का? दिवसातून एकदा किंवा दोनदा याने बॅटरी चार्ज केली तर फोनवर काही परिणाम होईल का?

Technology : मोबाईल वारंवार पाॅवर बँकने चार्च करणे किती सुरक्षीत? नवीन माहिती आली समोर
पाॅवर बँकImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 30, 2023 | 7:24 PM
Share

मुंबई : स्मार्टफोनची बॅटरी हा त्याचा मुख्य भाग आहे. जर बॅटरी डिस्चार्ज झाली तर स्मार्टफोन (Smartphone) फक्त एक डब्बा राहतो. म्हणजे त्याचं तुम्ही काहीही करू शकत नाही. हल्ली स्मार्टफोनमध्ये 5000 ते 6000mAh ची बॅटरी येऊ लागली आहे, त्यामुळे फोन दिवसभर चालतो. मात्र, त्यात तुम्ही सतत गेमिंग किंवा इतर कोणतेही काम करत असाल तर बॅटरीही लवकर संपू शकते. काही जण बॅटरी चार्ज करण्यासाठी पॉवर बँक (Power Bank) वापरतात. विशेषत: जेव्हा त्यांना सतत फोनवर काम करावे लागते. पॉवर बँकेबाबत अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, ती वापरल्याने बॅटरी खराब होते का? दिवसातून एकदा किंवा दोनदा याने बॅटरी चार्ज केली तर फोनवर काही परिणाम होईल का? जर होय, तर काय? आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

पॉवर बँक वापरून बॅटरी चार्ज करणे सुरक्षित आहे का?

पॉवर बँकेने बॅटरी चार्ज करण्यात कोणतीही अडचण येत नाही, तसेच फोन आणि बॅटरीवरही परिणाम होत नाही. अट एकच आहे की तुम्ही चांगल्या दर्जाची पॉवर बँक वापरावी आणि तिचा पॉवर आऊटपुट मोबाईल चार्जरएवढा असावा. स्वस्त पॉवर बँक स्मार्टफोनची बॅटरी खराब करू शकतात कारण जर ते जास्त चार्ज झाले तर ते खूप जास्त पॉवर आउटपुट सोडतात ज्यामुळे मोबाइल खराब होऊ शकतो. महागड्या किंवा चांगल्या पॉवर बँक कटऑफ तंत्रज्ञानासह येतात जे पूर्ण चार्ज होताच वीज पुरवठा बंद करतात जेणेकरून पॉवर बँक जास्त चार्ज किंवा ओव्हरलोड होणार नाही.

किती हजारांची पॉवर बँक सर्वोत्तम असेल?

तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे तुमचे बजेट ठरवते. दुसरे म्हणजे तुमची गरज. तुमचा लॅपटॉप आणि स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला पॉवर बँक हवी असेल तर तुम्ही अशी पॉवर बँक खरेदी करावी. जर तुम्हाला फक्त स्मार्टफोन चार्ज करायचा असेल तर अशी पॉवर बँक खरेदी करावी. आजकाल दोन्ही प्रकारच्या पॉवर बँका बाजारात उपलब्ध आहेत ज्या वेगवेगळ्या वॅट्सच्या असतात. चांगली पॉवर बँक 2 ते 3 हजारांच्या बजेटमध्ये येते जी 5v/3a, 9v/3a, 10v/5a आणि 12v/3a पॉवर आउटपुट देते.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!