लवकरच पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक बंद होणार?

| Updated on: Jun 06, 2019 | 9:00 PM

रस्त्यावर जितक्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढेल, तितके प्रदूषण कमी होईल. हळूहळू या वाहनांच्या वापरात वाढ होईल आणि त्यानंतर देशात वाढलेल्या प्रदूषण नियंत्रणात येईल.

लवकरच पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक बंद होणार?
Follow us on

मुंबई : देशात एप्रिल 2023 पर्यंत फक्त इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची विक्री केली जाईल. तर एप्रिल 2025 पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या जातील अशी नवीन शिफारस सरकारच्या नीती आयोगाने दिली असल्याचे सांगितले आहे. त्याशिवाय 150 सीसीपेक्षा अधिक क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी बनवण्यात याव्यात आणि त्याची विक्री कायम राहवी अशी शिफारसही नीती आयोगाने केली आहे.

31 मार्च 2023 पर्यंतची विक्री

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांची विक्री फक्त 31 मार्च 2023 पर्यंत करण्यात याव्यात. त्यानंतर देशात तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने तयार करावीत आणि त्यांचीच विक्री करण्यात यावीत अशी शिफारस केली आहे. तसेच पेट्रोल किंवा इतर इंधनासोबत चालणाऱ्या 150 सीसी क्षमता असलेली वाहनांची विक्री केवळ 31 मार्च 2025 पर्यंत असावी. यानंतर बाजारात फक्त इलेक्ट्रॉनिक वाहनं तयार करण्यात यावीत आणि देशात केवळ त्यांचीच विक्री करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

भारत ई व्हीकल मॅन्यूफॅक्चरिंग हब बनणार

आम्ही भारताला ई व्हीकल मॅन्यूफॅक्चरिंग बनवणार आहोत. ई व्हीकलला प्रोत्साहन देण्यासाठी सब्सिडीची योजना फेम-2 तयार केली आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की, सब्सिडी अशा वाहनांना मिळेल, जे भारतात तयार झाले असतील. प्रत्येक ई वाहनमध्ये 50 टक्के सामान भारतात तयार केलेले असावे, असेही अमिताभ कांत यांनी सांगितले

जगभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या भागीदारीत वाढ

“जगभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या भागीदारीत वाढ झाली आहे. भारतातही भागीदारी वाढली जाईल. रस्त्यावर जितक्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढेल, तितके प्रदूषण कमी होईल. हळूहळू या वाहनांच्या वापरात वाढ होईल आणि त्यानंतर देशात वाढलेल्या प्रदूषण नियंत्रणात येईल. तसेच भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.सध्या यासाठी 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गरज पडली तर अजून गुंतवणूक केली जाईल”, असेही त्यांनी सांगितले