Google वर 67 हा आकडा सर्च करताच हलू लागते स्क्रिन? एकदा ट्राय करा ही मजेशीर गोष्ट
गुगलवर '67' हा नंबर सर्च केल्यावर काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? ही एक मजेदार गुगल ट्रिक आहे आणि बऱ्याच लोकांना ती माहितीही नाहीये. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

आजच्या आधुनिक युगात गुगल आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लहान असो वा मोठे प्रत्येकजण कोणत्याही अडलेल्या गोष्टीसाठी गुगल सर्चवर अवलंबून असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की गुगलमध्ये काही मनोरंजक फीचर्स आणि ट्रिक्स आहेत जे वापरकर्त्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी डिझाइन केले आहेत? गुगलवर 67 हा नंबर खूप सर्च केला जात आहे, पण हा नंबर काय आहे आणि तो एंटर करून सर्च केल्यावर स्क्रिनवर काय होतं? चला तर मग आजच्या लेखात या मजेदार ट्रिक बद्दल जाणून घेऊयात.
67 या नंबरचा आकडा तुम्ही गुगल सर्च रिझल्ट खूप मनोरंजक आणि मजेदार आहे. जेव्हा तुम्ही ही ट्रिक ट्राय कराल तेव्हा तुम्हाला क्षणभर धक्का बसेल, पण पुढच्याच क्षणी तुम्हाला कळेल की ही ट्रिक खूप मजेदार आहे. अशातच रिॲक्शन व्हिडिओ लाँच झाल्यापासून एक्स आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
67 सर्च केल्यानंतर काय होते?
गुगल सर्च बारमध्ये 67 किंवा 6-7 टाइप करा. सर्च रिझल्ट्स दिसताच, तुमच्या कंप्युटर किंवा मोबाईल तसेच टॅबलेट स्क्रीन अचानक काही सेकंदांसाठी हलू लागते. अचानक झालेल्या या हालचालीमुळे अनेक वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत. ही ट्रिक केवळ कंप्युटर/लॅपटॉपवरच नाही तर फोनवरही काम करते. काळजी करण्याची गरज नाही. ही कोणतीही हार्डवेअर समस्या नाही, तर हे एक गुगलच मजेदार फिचर आहे. जे पूर्णपणे मनोरंजनासाठी आहे.
या पद्धतीने ट्राय करा
तुमच्या फोन, कंप्युटर किंवा लॅपटॉपवर गुगल उघडा.
सर्च बारमध्ये 67 टाइप करा आणि एंटर दाबा.
काही सेकंदांसाठी स्क्रीन थरथरायला लागेल.
हे सुरक्षित आहे का?
हे फीचर सुरक्षित आहे का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. हो, हे फीचर पूर्णपणे मनोरंजनासाठी आहे. काही सेकंद स्क्रिन हलल्यानंतर, मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीन आपोआप सामान्य होईल. जर काही कारणास्तव हा प्रभाव कायम राहिला तर पेज रिफ्रेश करा किंवा बॅक बटणावर क्लिक करा आणि डिस्प्ले परत येईल.
