
Find Stolen Phone : सध्या स्मार्टफोन हा काही संवादाचे माध्यम उरला नाही. तर तो एक छोटा संगणक, लॅपटॉपच नाही तर टॅब झाला आहे. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रं, बँकिंग ॲप्लिकेशन्स आणि वैयक्तिक माहिती जतन असते. त्यामुळे थोडावेळ जरी स्मार्टफोन दुरावला तर जीव कासावीस होतो. त्यात फोन चोरीला गेल्यावर तर पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय हाती काही उरत नाही. पण आता असे होणार नाही. चोरीला गेलेलाय फोनच तुम्हाला गाईडन्स करेल. मोबाईल परत मिळण्याचा मार्ग दाखवलेच. पण चोरट्याचा सेल्फीही काढून तुमच्याकडे पाठवेल. त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँटी-थेफ्ट ॲप इन्स्टॉल करावे लागेल.
अँटी-थेफ्ट ॲपची दहशत
ही अँटी-थेफ्ट ट्रिक सध्या चर्चेत आहे. त्यासाठी अँटी-थेफ्ट ॲप आवश्यक आहे. बिटडेफेंडर, प्रेय अथवा सेर्बेरस यासारखी ॲप्स (Apps like Bitdefender, Prey, or Cerberus) यासाठी उत्कृष्ट मानले जातात. गोपनीयता राखण्यासाठी, हे प्लॅटफॉर्म मदत करतात. हे ॲप्स नेहमी अधिकृत ॲप स्टोअरमधून डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.
स्टेप-बाय-स्टेप असे करा इन्स्टॉल
अँटी-थेफ्ट ॲप डाउनलोड केल्यानंतर अशी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण करा. हे ॲप युझर्सला कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन आणि स्टोरेज ॲक्सेस करण्याची परवानगी मागते. या प्रक्रियेसाठी सेल्फी काढण्यासाठी, ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी आणि लोकेशन ट्रॅकिंगसाठी परवानगी द्यावी लागेल. नंतर ॲप युझर्सला डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस मागेल. हे ॲप युझर्सचा फोन लॉक करण्यापासून, डेटा पुसण्यापासून अथवा अनइंस्टॉल करण्यापासून रोखण्यासाठी हा अॅक्सेस मागतो. त्यामुळे फोन चोरीला गेल्यावर हा प्लॅटफॉर्म तरबेजपणे पुढील प्रक्रिया करतो.
Thief Selfie फीचर ऑन करा
ॲपमध्ये, युझर्सला Thief Selfie अथवा Intruder Capture या नावाचे खास फिचर मिळते. हे फीचर अगोदर सुरु करा. फोन चोरीला गेला आणि चुकीच्या पद्धतीने चोरट्याने पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न केला. फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. सिम कार्ड बदलेल, तेव्हा हे Thief Selfie फीचर आपोआप चोरट्याचा सेल्फी घेईल आणि तुमच्या ईमेल पत्त्यावर तो पाठवून देईल. क्लाऊड स्टोरेज अथवा जो आपत्कालीन मोबाईल क्रमांक नोंदवला, त्याच्यावर तो फोटो पाठवेल.
दुसऱ्या डिव्हाईसवरून ॲपमध्ये लॉग इन करा
या ॲपमुळे चोराचे लोकेशन, फोटो आणि लॉकिंगसारखी सर्व वैशिष्ट्ये योग्यरित्या काम करत आहेत की नाही हे तपासण्यासाठी ॲपच्या टेस्ट मोडमध्ये जावे लागेल. युझर ॲप लॉगिनची माहिती तुम्हाला ई-मेल अथवा इतर ठिकाणी जतन करावी लागेल. ही माहिती वहीत नमूद करुन ठेवा. फोन चोरीला गेला अथवा हरवला तर युझर्स फोनचे स्थान ट्रॅक करण्यासाठी, चोराचा सेल्फी पाहण्यासाठी आणि गरज पडल्यास फोनचा डेटा लॉक करण्यासाठी, रिंग करण्यासाठी अथवा मजकूर पुसण्यासाठी दुसऱ्या डिव्हाइस वापर करून या ॲपमध्ये लॉग इन करू शकेल आणि पोलिसांना ही माहिती देऊ शकेल.