2TB स्टोरेज आणि 6000mAh बॅटरी असलेला हा स्वस्त फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
तुम्ही जर कमी बजेटमध्ये 5जी फोन शोधत असाल, तर भारतात लाँच झालेल्या या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी, 48 मेगापिक्सेल, एआय की आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग आजच्या लेखात हा फोन कोणत्या कंपीनचा आहे तसेच त्याची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा आहे, पण बजेट 15 हजारच्या आसपास असेल तर चिंता करू नका कारण आता Ai+ Nova 2 Neo 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, 2GB पर्यंत वाढवता येणारी स्टोरेज आणि 48-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा यांचा समावेश आहे. या डिव्हाइसची किंमत 13 हजार ते 14 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि ते फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज, आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 12 हजार 999 रूपये आहे, तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रूपये आहे. उपलब्धतेनुसार, हा फोन 26 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. स्पर्धेच्या बाबतीत हा 5G फोन Vivo T4 Lite 5G, realme P4 Lite 5G आणि Samsung M06 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
Ai+ Nova 2 Neo 5G फिचर्स
चिपसेट: या 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
डिस्प्ले: या बजेट फोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा सोनी IMX582 AI कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी क्षमता: फोनला पॉवर देण्यासाठी 6000 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
स्टोरेज: फोनमध्ये 128 GB इंटर्नल स्टोरेज असले तरी, SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 2 TB पर्यंत वाढवता येते.
प्रमुख वैशिष्ट्ये: सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला असलेल्या पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे. या फोनमध्ये एआय (AI) सपोर्टदेखील उपलब्ध आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित NxtQuantum OS वर चालतो.
कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये ड्युअल सिम 5G फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस सारखी वैशिष्ट्ये असतील.