तुमच्या कपड्यानुसार रंग बदलणार ही स्मार्ट वाॅच, अशा प्रकारे काम करेल टेक्नाेलाॅजी

अॅपलच्या या पेटंटची माहिती पहिल्यांदा अॅपलने दिली आहे. हे वैशिष्ट्य सादर केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अॅपल वॉचचा रंग मॅच करू शकाल.

तुमच्या कपड्यानुसार रंग बदलणार ही स्मार्ट वाॅच, अशा प्रकारे काम करेल टेक्नाेलाॅजी
अॅपल वाॅच
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 25, 2023 | 11:40 AM

मुंबई : सध्या युग मायक्रो टेक्नॉलॉजीचे आहे. पुर्वी फक्त फोन स्मार्ट असायचे आता प्रत्येकच गोष्ट स्मार्ट झालेली आहे. यामध्ये सध्या स्मार्ट वाॅचचे (Apple Watch) चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. यातही तुम्ही अॅपल वॉचचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी अॅपल वॉच तुमच्या कपड्यांनुसार रंग बदलेल. अॅपल वॉच वॉचसोबत रंग बदलणारे तंत्रज्ञान सपोर्ट करणार असल्याची माहिती आहे. रंग बदलणाऱ्या अॅपल वॉचचे पेटंट समोर आले आहे.

अशा प्रकारे काम करेल टेक्नाेलाॅजी

रिपोर्टनुसार, अॅपल वॉच अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या कपड्यांनुसार अॅपल वॉचचा रंग बदलू शकाल. फोनवर कलर चेंज नोटिफिकेशन देखील मिळेल. पेटंटनुसार, कंपनी या विशिष्ट ऍपल वॉचच्या बँडसाठी इलेक्ट्रोक्रोमिक घटक वापरेल.

अॅपलच्या या पेटंटची माहिती पहिल्यांदा अॅपलने दिली आहे. हे वैशिष्ट्य सादर केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अॅपल वॉचचा रंग मॅच करू शकाल. नवीन घड्याळासह तीन पट्ट्याचे डिझाइन उपलब्ध असतील आणि प्रत्येक पट्ट्याला एक विशेष रंग असेल. पट्ट्याचा रंग सॉलिग आणि पैटर्न दोन्ही असल्याचे म्हटले जाते. याशिवाय बँडचा रंग न काढताही बदलता येऊ शकतो, असा दावाही केला जात आहे. वापरकर्त्यांना रंग समायोजित करण्याचा पर्याय देखील असेल.

वापरकर्त्यांना फोनवर येणा-या नोटिफिकेशन्सची माहिती फक्त स्ट्रॅपच्या रंगावरूनच मिळेल, तथापि Apple ने अद्याप या फीचरबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. ऍपल वॉचमध्ये ब्लड शुगर मॉनिटरिंगचे फीचरही उपलब्ध होणार असल्याची बातमी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साखर तपासण्यासाठी तुम्हाला सुई लागणार नाही, अॅपलने अद्याप या फिचरबद्दल अधीकृत दुजोरा दिलेला नाही.