फेसबुकचं ‘हे’ नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देणार

मुंबई : फेसबुक दर दुसऱ्या दिवशी कुठलं ना कुठलं नवं फीचर आणत असतो. फेसबुक आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्न करतो. आता कंपनीने ‘फेसबुक डेटिंग’ या अॅप्लिकेशन मध्ये एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फेसबुकवरील मित्रांना डेट करु शकता. ‘सीक्रेट क्रश’ नावाचं हे नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम शोधण्यात आणि […]

फेसबुकचं 'हे' नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : फेसबुक दर दुसऱ्या दिवशी कुठलं ना कुठलं नवं फीचर आणत असतो. फेसबुक आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्न करतो. आता कंपनीने ‘फेसबुक डेटिंग’ या अॅप्लिकेशन मध्ये एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फेसबुकवरील मित्रांना डेट करु शकता. ‘सीक्रेट क्रश’ नावाचं हे नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम शोधण्यात आणि मिळवून देण्यात मदत करेल. यामध्ये तुम्ही कुठल्याही नऊ अशा मित्रांना जोडू शकता ज्यांना तुम्ही डेट करु इच्छिता.

फेसबुकने कॅलिफोर्नियाच्या सान जोस येथे मंगळवारी झालेल्या वार्षिक ‘एफ 8’ सम्मेलनात या फीचरबाबत माहिती दिली. “जर तुम्ही तुमच्या क्रशला ‘फेसबुक डेटिंग’साठी निवडलं असेल, तर त्यांना एक नोटीफिकेशन जाईल की, त्यांना कुणी पसंत केलं आहे. त्यानंतर जर त्याने त्याच्या ‘सीक्रेट क्रश’मध्ये तुम्हाला निवडलं, तर हे ‘मॅच’ म्हणजेच एक जोडी बनेल”, असं या संमेलनात सांगण्यात आलं.

“जर तुमचा क्रश ‘डेटिंग’वर नसेल, तर ‘सीक्रेट क्रश’ यादी बनवू नका. तसेच, त्यांच्या यादीतही जोडले जाऊ नका, जेणेकरुन कुणालाही तुम्ही कुठल्या मित्राचं नाव जोडलं आहे, हे कळणार नाही”, असेही फेसबुकने सांगितले.

फेसबुकवर तुम्ही फेसबुक इवेंट्स, ग्रुप्स, फ्रेंड्स ऑफ फ्रेंड आणि इतर कुठल्याही कम्यूनिटी इत्यादी पर्यायांद्वारे तुम्ही स्वत:साठी ‘मॅच’ शोधू शकता.

हे फीचर कोलंबिया, थायलंड, कॅनडा, अर्जेन्टीना आणि मेक्सिको येथील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं होतं. मात्र, आता हे फीचर फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, लाओस, ब्राझील, पेरु, चिली, बोलिव्हिआ, इक्वाडोर, उरुग्वे, पराग्वे, गयाना आणि सुरीनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचलं आहे.

तसेच, युझर्सची शाळा, कार्यालय किंवा शहरातील सारख्या कम्युनिटीमधील नवीन लोकांशी ओळख व्हावी, मैत्री व्हावी यासाठी कंपनीने ‘मीट न्यू फ्रेंड्स’ हे फीचर आणलं आहे, असेही फेसबुकने सांगितलं.

संबंधित बातम्या :

कॉलेज तरुणांसाठी खास विजेवर चालणारी स्कूटी

परवानगीशिवाय ‘गुगल पे’ भारतात कसं चालतंय? हायकोर्टाचा सवाल

निवडणुकीसाठी ट्विटरने नियम बदलले

दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.