कॉलेज तरुणांसाठी खास विजेवर चालणारी स्कूटी

हैदराबाद : कॉलेज तरुणांमध्ये बाईक किंवा स्कूटीची क्रेझ मोठ्या प्रमाणात असते. यासाठी हैदराबादमधील एक स्टार्टअप कंपनी तरुणांसाठी खास स्कूटी घेऊन येत आहे. लवकरच ही स्कूटी रस्त्यावर धावणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने पर्यावरणाचा विचार करता या स्कूटीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी विजेवर चालणारी स्कूटी तयार केली आहे. प्युअर ईव्ही असं या स्कूटीचं नाव आहे. प्युअर ईव्ही यंदा भारतात …

कॉलेज तरुणांसाठी खास विजेवर चालणारी स्कूटी

हैदराबाद : कॉलेज तरुणांमध्ये बाईक किंवा स्कूटीची क्रेझ मोठ्या प्रमाणात असते. यासाठी हैदराबादमधील एक स्टार्टअप कंपनी तरुणांसाठी खास स्कूटी घेऊन येत आहे. लवकरच ही स्कूटी रस्त्यावर धावणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने पर्यावरणाचा विचार करता या स्कूटीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी विजेवर चालणारी स्कूटी तयार केली आहे. प्युअर ईव्ही असं या स्कूटीचं नाव आहे.

प्युअर ईव्ही यंदा भारतात दहा हजार विजेवर चालणाऱ्या स्कूटी लाँच करणार आहेत. प्युअर ईव्ही हैदराबादमधील एक स्टार्टअप PuREnergy चा भाग आहे. ही कंपनी विजेवर चालणाऱ्या वाहनांवर काम करत आहे.

 FAME INDIA तर्फे विजेवर चालणाऱ्या वाहनांना मदत

पेट्रोल- डिझेलची वाढती किंमत आणि पेट्रोल-डिझेलमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडूनही विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी सरकारनेही फेम इंडिया योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे बजेट ठरवले. विजेवर चालणाऱ्या वाहनांना फेम इंडिया योजनेअंतर्गत 10 लाख विजेवर चालणाऱ्या रजिस्टर स्कूटी गाड्यांवर प्रत्येकी 20 हजार रुपये दिले जातील.

विजेवर चालणाऱ्या रिक्षालाही प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. 35 हजार इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलरलाही प्रत्येकी दीड लाखांची मदत दिली जाणार. देशात आतापर्यंत 2 लाख 78 हजार विजेवर चालणाऱ्या गाड्यांची विक्री झाली आहे. या विजेवर चालणाऱ्या वाहनांनी दररोज 52 हजार लीटरपेक्षा अधिक पेट्रोलची बचत होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *