‘वन प्लस’चा हा स्मार्टफोन फक्त पाच 5 मिनिटांत 50 टक्के होईल चार्ज; जाणून घ्या Oneplus Ace ची किंमत, वैशिष्टये!

OnePlus ने गुरुवारी आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव OnePlus Ace आहे. कंपनीने प्रथमच Ace मालिका सादर केली आहे, असा दावा समोर आलेल्या अहवालात करण्यात आला आहे. हा मोबाईल भारतात OnePlus 10R नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

‘वन प्लस’चा हा स्मार्टफोन फक्त पाच 5 मिनिटांत 50 टक्के होईल चार्ज; जाणून घ्या Oneplus Ace ची किंमत, वैशिष्टये!
‘वन प्लस’चा हा स्मार्टफोन फक्त पाच 5 मिनिटांत 50 टक्के होईल चार्जImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:38 PM

कंपनीने OnePlus Ace या फोनमध्ये MediaTek MediaTek Dimension 8100 चिपसेट (Chipset) वापरली असून, चीनमध्ये तो आधिच लॉंच झाला आहे. तसेच, हा स्मार्टफोन 150W फास्ट चार्जरसह येतो, ज्यामुळे हा फोन फक्त 5 मिनिटांत 0-50 टक्के चार्ज होतो. या स्मार्टफोनला 120hz चा रिफ्रेश रेट एमोलेड पॉल मिळेल. OnePlus चा हा नवीन स्मार्टफोन डिझाइन (Smartphone design) पाहता रिअॅलिटी डीटी निओ 3 सारखा दिसतो. आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, OnePlus आणि Realme कंपनी दोन्ही BBK ब्रँड अंतर्गत येतात. याच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 6.7-इंचाचा डायगोनल फुल एचडी प्लस रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंग (Scrolling and gaming) सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो.

OnePlus Ace चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Ace च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये MediaTek Dimension 8100 Max चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 8 GB आणि 12 GB रॅम सह येतो. यामध्ये यूजर्सना 512 GB पर्यंत स्टोरेज मिळते. मीडियाटेक डायमेंशन 8100 च्या मॅक्स व्हर्जनचा अर्थ काय आहे हे कंपनीने अद्याप सांगितलेले नसले तरी, त्यात एआय क्षमता वाढवण्यात आली आहे.

OnePlus Ace बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

या नवीन OnePlus स्मार्टफोनमध्ये 4500 mAh बॅटरी आहे, जी 150W सुपरवूक फास्ट चार्जिंगसह येते. यासोबतच कंपनीने काही बॅटरी सेफ्टीसाठी तंत्र वापरले आहेत. हा मोबाइल ColorOS 12.1 वर काम करतो, जो Android 12 सह येतो, जो युजर्सच्या सोयीसाठी तयार करण्यात आला आहे.

OnePlus चा कॅमेरा सेटअप

OnePlus Ace स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये फ्रन्ट कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. यात 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. यातील थर्ड लेन्स 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे.

OnePlus Ace ची किंमत

OnePlus च्या या फोनच्या बेसीक मॉडेलची किंमत CNY 2699 (जवळपास 32 हजार रुपये) आहे, ज्यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे. सेंकड वेरिएंटची किंमत CNY 2,999 (सुमारे 35 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 265 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.

हेही वाचा:

Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक

Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले

Non Stop LIVE Update
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल
ठाकरे गटात मानसिक खच्चीकरण, 'या' महिला नेत्यांची नावं घेत पक्षाला ठोकल.
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही...
झिशान सिद्दीकींनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही....
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर
मंत्र्यांना खाली उतरवले, चिमुकल्यांना घडवली शिंदेंनी हेलिकॉप्टरची सफर.
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?
फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, आंदोलनाचा खर्चही केला; कुणाचा घणाघात?.
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल.
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव.
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.