AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय बाजारपेठेत Smartphone च्या शर्यतीत ‘या’ ब्रँडचा फोन आहे पहिल्या स्थानावर, जाणून घ्या

जून ते सप्टेंबर या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत लक्षणीय वाढ दिसून आली. प्रीमियम स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे विवो, रियलमी, ओप्पो, सॅमसंग, आणि शाओमी यासारख्या कोणत्या प्रमुख ब्रँडने सर्वाधिक विक्री केली ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

भारतीय बाजारपेठेत Smartphone च्या शर्यतीत 'या' ब्रँडचा फोन आहे पहिल्या स्थानावर, जाणून घ्या
smartphone
| Edited By: | Updated on: Nov 14, 2025 | 8:04 AM
Share

भारतीय बाजारपेठेत दररोज अनेक ब्रँडचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच जून ते सप्टेंबर या तिमाहीत स्मार्टफोनचे भारतीय बाजारपेठेत प्रचंड वाढ झाली आहे. आयडीसीच्या अलिकडच्या अहवालात असे दिसून आले आहे की प्रीमियम स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात तेजी दिसून आली आहे. तर अहवालात दिलेल्या माहितीनुसार चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये 18.3 टक्के सह भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत त्यांनी आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे, तर अ‍ॅपलने केवळ एका तिमाहीत 5 दशलक्ष आयफोनची आतापर्यंतची सर्वाधिक शिपमेंट पाठवली आहे.

मोबाईल शिपमेंट : कोण पुढे आहे आणि कोण मागे आहे हे जाणून घेऊयात

जून ते सप्टेंबर या तिमाहीत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये जवळपास 21 टक्क्यांनी वाढ होत असताना बाजारपेठेत मोबाईल विक्रीमध्ये विवोने 18.3 टक्के वाटा घेऊन बाजारपेठेत आघाडी घेतली. त्यानंतर ओप्पोने 13.9 टक्के वाट्यासह दुसऱ्या स्थानावर, सॅमसंग 12.6 टक्के वाट्यासह तिसऱ्या स्थानावर तर अ‍ॅपल हे 10.4 टक्के वाट्यासह चौथ्या स्थानावर आहे. त्यात रिअलमी 9.8 टक्के वाट्यासह पाचव्या स्थानावर आणि शाओमी कंपनी 9.2 टक्के वाट्यासह सहाव्या स्थानावर आहे.

भारतीय बाजारात महागड्या फोनची वाढती मागणी

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) नुसार, जून ते सप्टेंबर या तिमाहीत 53,000 ते 71,000 युनिट्सपर्यंतच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 43.3 % वाढ झाली आहे. यामुळे प्रीमियम सेगमेंटचा बाजार हिस्सा 4 % वरून 6 % पर्यंत वाढला आहे. हाय-एंड फोन विक्रीमध्ये आयफोन 15, आयफोन 16 आणि आयफोन 17 हे आघाडीवर आहेत.

सुपर प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रचंड वाढ

71,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुपर-प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 52.9% वाढ झाली आहे. या सेगमेंटचा बाजार हिस्सा आता 6% वरून 8% पर्यंत वाढला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की प्रीमियम फीचर्स असलेले हाय-एंड स्मार्टफोन ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

Follow Us
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन