
पुढील महिन्यात Vivo X300 Max सोबत Vivo X300 Ultra लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने अद्याप लॉन्च तारखेची पुष्टी केलेली नाहीये. मात्र एका टिपस्टरने अलीकडेच Vivo X300 Ultra चा चिपसेट, कॅमेरा, बॅटरी क्षमता, चार्जिंग स्पीड आणि डिस्प्ले स्पेसिफिकेशन लीक केले आहेत. अल्ट्रा मॉडेल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह विवोचा हा नवीन हँडसेट लाँच करण्याची तयारी सुरू आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण लीकनुसार या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाणून घेऊयात.
Vivo X300 Ultra चे अपेक्षित फिचर्स
X वरील एका पोस्टमध्ये, टिपस्टरने कथित Vivo X300 Ultra चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लीक केले आहेत, ज्यात फोनचा डिस्प्ले साईज, चिपसेट, बॅटरी कॅपेसिटी आणि कॅमेरा कॉन्फिगरेशन यांचा समावेश आहे. चीनमध्ये लाँच झाल्यानंतर हा स्मार्टफोन भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये लाँच होईल असा दावाही त्यांनी या लीक दरम्यान केला आहे. Vivo X300 Ultra मध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेट असल्याचे म्हटले जाते, जो 3nm प्रक्रियेवर बनवलेला आहे.
या फोनमध्ये 7000 एमएएचची दमदार बॅटरी असल्याचा दावा केला जात आहे आणि तसेच हा फोन 100 वॅट वायर्ड आणि 40 वॅट वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो. या हँडसेटमध्ये 6.82-इंचाचा 2के फ्लॅट LTPO OLED डिस्प्ले आहे, धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP69 रेटिंगसह येण्याची अपेक्षा आहे आणि त्यात USB 3.2 टाइप-सी पोर्ट देखील असू शकतो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या आगामी Vivo फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, ऑप्टिकल झूमसह 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि चांगल्या रंग अचूकतेसाठी 5-मेगापिक्सेलचा सेन्सर असू शकतो.
सेल्फीसाठी, या अल्ट्रा मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असू शकतो. तसेच लीकनुसार हा फोन चीनमध्ये स्प्रिंग फेस्टिवल संपल्यानंतर म्हणजेच 3 मार्च नंतर Vivo X300 Ultra लाँच केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.