AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कारणामुळे नाना पाटेकरांनी बॉलिवूडकडे फिरवली होती पाठ? अंत्यसंस्कारानंतर प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत…

नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील मोजकेच कलाकार उपस्थित होते. यावर प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया देत नानांच्या मोठेपणाची आठवण करून दिली. त्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊयात...

या कारणामुळे नाना पाटेकरांनी बॉलिवूडकडे फिरवली होती पाठ? अंत्यसंस्कारानंतर प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत...
Pravin tarde on nana patekarImage Credit source: social media
| Updated on: Oct 11, 2026 | 1:18 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील मोजकेच कलाकार उपस्थित होते. यानंतर आता दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पाटेकर यांनी बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं, पण त्यांची ओळख केवळ चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नव्हती. त्यांना गावात, शेतात रमायला आवडायचं. शूटिंग संपल्यानंतर ते थेट गावी जात असत. बॉलिवूडमधील पार्ट्या आणि इतर समारंभांपासून त्यांनी अनेकदा अंतर ठेवलं होतं. नानांच्या याच स्वभावाची आठवण करून देणारी प्रतिक्रिया आता प्रवीण तरडे यांनी दिली आहे.

नानांपेक्षा बॉलिवूड मोठं नाही, प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील कलाकारांची उपस्थिती कमी असल्याबाबत प्रवीण तरडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “बॉलिवूडचे लोक आले नाहीत म्हणून नानांचं मोठेपण कमी होत नाही. नानांपेक्षा बॉलिवूड मोठं नाहीये. नाना खूप मोठे होते.” नाना पाटेकर यांच्या अंत्ययात्रेला राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शेतकरी आले होते. वर्धा, गडचिरोली आणि धुळ्यासारख्या ठिकाणांहून शेतकरी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. याचा उल्लेख करताना तरडे म्हणाले, “नानांच्या अंत्ययात्रेला काही हजार शेतकरी आले होते. त्यांच्या अंगाला घामाचा वास होता, मातीचा वास होता.”

नानांनी स्वतःची ओळख शेतकरी म्हणूनच जपली

नाना पाटेकर यांनी अनेक मुलाखतींमध्ये शूटिंग संपल्यानंतर गावी जाणं आणि शेतात रमणं आवडत असल्याचं सांगितलं होतं. बॉलिवूडमधील पार्ट्या किंवा इतर समारंभांना जाण्यापेक्षा त्यांना आपल्या माणसांमध्ये आणि गावाकडे वेळ घालवायला आवडायचं. त्यामुळे त्यांचं चित्रपटसृष्टीतील वर्तुळ मोठं असलं, तरी त्यांची ओळख केवळ बॉलिवूडपुरती नव्हती. याच मुद्द्यावर बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “नाना कधी म्हटले मी बॉलिवूडचा आहे? नानांनी आयुष्यभर मी शेतकरी आहे म्हणूनच मिरवलं ना.”

एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रवीण तरडे यांनी ही प्रतिक्रिया दिली. नानांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील कलाकारांनी यायला हवं होतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. “निदान ज्यांना नाना स्वतःचे मित्र म्हणतो, त्यातलं फक्त जॅकी श्रॉफ तिथं होते. सुरेश वाडकर होते. पण यायला पाहिजे होतं,” असं तरडे म्हणाले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे