Online Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स!

| Updated on: Sep 27, 2020 | 5:26 PM

वापरकर्त्याने केलेली एक चूक, त्याचे संपूर्ण खाते रिक्त करते. अशा परिस्थितीत आपणही बँकिंग अ‍ॅप्स वापरत असाल, तर या काही गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतल्या पाहिजेत.

Online Mobile Banking | डिजिटल फ्रॉडपासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स!
Follow us on

मुंबई : कोरोना महामारीमुळे जवळजवळ संपूर्ण जग डिजिटल झाले आहे. प्रत्यक्ष व्यवहार ठप्प झाल्याने सगळ्यांनी डिजिटल विश्वाला आपलेसे केले आहे. ज्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मची फारशी माहिती नव्हती, ते ही या या नव्या गोष्टी शिकून घेत आहेत. मात्र, त्यांच्या या कमकुवतपणाचा फायदा अनेक हॅकर्स घेत आहेत. आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवरील खात्यांमधून पैसे चोरल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. वापरकर्त्याने केलेली एक चूक, त्याचे संपूर्ण खाते रिकामी करू शकते. अशा परिस्थितीत आपणही बँकिंग अ‍ॅप्स वापरत असाल, तर या काही गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतल्या पाहिजेत… (Tips for Secure Mobile Online Banking)

 

  • मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचर

एकच पासवर्ड असल्यास तो क्रॅक करणे हॅकर्ससाठी सोपे असते. परंतु, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचर म्हणजेच पासवर्ड व्यतिरिक्त आणखी काही सुरक्षा ठेवली असता ती तोडणे सोपे नसते. अशावेळी आपणही आपल्या बँकिंग अ‍ॅप्समध्ये मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचरचा उपयोग केला पाहिजे. यात युजरला लॉग इन करण्यासाठी फिंगर प्रिंट स्कॅनर, ओटीपी, डेबिट कार्ड क्रमांक या गोष्टींची आवश्यकता असते. ही मल्टी लेयर सुरक्षा आपल्याला खात्याला ऑनलाईन चोरांपासून सुरक्षित ठेवते.

  • एनएफसी-एम्बेडेड सिम कार्डचा वापर

एनएफसी-एम्बेडेड सिम कार्ड हे एक असे सिम कार्ड आहे, जे ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती नियर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) सिम कार्डवर सुरक्षितपणे डाउनलोड करू देते. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरील डिजिटल कार्डद्वारे पेमेंट करता येते. या पर्यायामुळे ग्राहकांना त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे कार्ड हरवण्याचा किंवा विसरण्याचा कोणताही प्रकार घडत नाही. याशिवाय कार्ड हॅक होण्याची शक्यताही नसते.

  • एंड-टू-एंड इन्क्रिप्शन

आजकाल डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहेत. जगभरात पेमेंट कार्ड, व्यापारी, कार्ड ब्रँड, बँक कार्ड्स अशा अनेक प्रकारे कोट्यवधींचे व्यवहार केले जातात. या व्यवहारांवर हॅकर्सचे लक्ष असते. अशावेळी, एंड-टू-एंड इन्क्रिप्शन हा या धोक्यावरील सगळ्यात महत्त्वाचा आणि खबरदारीचा उपाय आहे. यामुळे डेटा सुरक्षित राहण्याची खात्री मिळते. एंड-टू-एंड इन्क्रिप्शन हे सिक्युरिटी ऑडिट आणि पेनट्रेशन टेस्ट करते, जे सुरक्षेचे महत्त्वाचे निकष आहेत. (Tips for Secure Mobile Online Banking)

  • फिंगरप्रिंट स्कॅनर असणाऱ्या उपकरणांचा वापर

आता बर्‍याच बँक अ‍ॅप्सही फिंगरप्रिंट सुरक्षा देतात. तथापि, ही सुविधा केवळ फिंगरप्रिंट स्कॅनर असणाऱ्या स्मार्टफोनमध्येच वापरता येऊ शकते. त्याला आयपी अ‍ॅड्रेस, स्थान, वेळ, डिव्हाइस प्रकार, स्क्रीन सीज, ब्राउझर इ. सारख्या वेगवेगळ्या सिग्नलचे सेट्स प्राप्त होतात. त्यामुळे अशा स्मार्टफोन्सवरून ऑनलाईन बँकिंग करणे अधिक सुरक्षित असते.

  • रियल टाइम टेक्स्ट आणि ईमेल अलर्ट

आपण आपल्या खात्याशी संबंधित रियल टाइम टेक्स्ट आणि ईमेल अलर्ट कायम सुरू ठेवला पाहिजे. जेणेकरून जर आपल्या खात्याशी संबंधित कोणताही व्यवहार झाला, तर आपणास त्यासंबंधी त्वरित अ‍ॅलर्ट मिळेल. ही सुविधा मिळत नसल्यास आपण एकदा आपल्या बँकेत याबाबत विचरणा करू शकता.

  • अ‍ॅपचा स्त्रोत (सोर्स)

आजकाल बरेच हॅकर्स बँकेसारखे अॅप्स तयार करतात आणि अ‍ॅप स्टोअरवर ठेवतात. अशा परिस्थितीत जर आपण घाईत चुकीचे अॅप डाउनलोड केले असेल, तर तुमच्या पैशांसह, फोनचा डेटाही चोरीला जाऊ शकतो. जेव्हा आपण एखादा अ‍ॅप डाऊनलोड कराल, तेव्हा त्याचे डेव्हलपर, इन्स्टॉल रेटिंग, रीव्हीव्हू इत्यादी माहिती नीट तपासा. या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवून आपणा आपली ऑनलाईन बँकिंग सुरक्षित ठेवू शकतो.

(Tips for Secure Mobile Online Banking)

 

संबंधित बातम्या : 

PAYTM | पेटीएम युजर्सना धक्का, गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम अ‍ॅप हटवले

चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी, Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणतात…