
तुमचा टीव्ही वारंवार बंद पडतोय का? तर फक्त टीव्हीच दोषी नाही, तर तो लावलेली जागाही कारणीभूत असू शकते. बऱ्याचदा आपण टीव्ही कुठे लावायचा याकडे फारसं लक्ष देत नाही आणि नंतर त्याच्या सतत होणाऱ्या बिघाडामुळे हैराण होतो. पण तज्ज्ञ सांगतात की काही विशिष्ट ठिकाणी टीव्ही लावणं म्हणजे त्याचं आयुष्यच कमी करणं होय. सोशल मीडियावरही याबाबत अनेक चर्चा सुरु असून, त्यावर आधारित आणि तज्ज्ञांच्या मताने, आम्ही अशा 5 प्रमुख चुकांची माहिती देत आहोत ज्या घरात टीव्ही लावताना टाळल्या पाहिजेत.
1. ओलसर भिंतींवर
जर टीव्ही अशा भिंतीवर लावला असेल ज्यावर सीलन (ओलसरपणा) आहे, तर टीव्ही खराब होणं जवळपास निश्चित आहे. या भिंतीतील नमी हळूहळू टीव्हीच्या इलेक्ट्रॉनिक भागांपर्यंत पोहोचते. यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका वाढतो, आणि स्क्रीनवर फंगससुद्धा निर्माण होतो. म्हणूनच नेहमी कोरड्या, मजबूत आणि स्वच्छ भिंतीवरच टीव्ही बसवावा.
2. कुलरच्या समोर
गर्मीच्या दिवसांत घरात कुलर लावले जातात आणि अनेकदा त्याच्यासमोर टीव्ही ठेवला जातो. पण कुलरमधून येणाऱ्या हवेतील छोटे पार्टीकल असतात जे टीव्हीच्या सर्किटमध्ये जाऊन नुकसान करतात. तज्ज्ञ सांगतात की, फक्त उन्हाळ्यातच जितके टीव्ही बिघडतात, तेवढे इतर हंगामात नाही. कुलरमुळे टीव्ही गरम होतो आणि त्याचा सर्किट दुरुस्त करावाच लागतो.
3. बंद केबिनेटमध्ये
काही जण घरात सौंदर्यदृष्ट्या टीव्ही केबिनेटमध्ये किंवा कपाटात बसवतात. पण जर तिथे हवा खेळती नसेल, तर टीव्ही खूप लवकर गरम होतो. त्यामुळे त्याचा मदरबोर्ड किंवा सर्किट जळण्याचा धोका निर्माण होतो. टीव्ही लावताना त्याच्या चारही बाजूंनी वायुवीजन (ventilation) आवश्यक आहे.
4. बाथरूम शेजारी
जर टीव्ही अशा भिंतीवर आहे ज्याच्या दुसऱ्या बाजूला बाथरूम आहे, तर त्यामधून येणाऱ्या नमीमुळे टीव्हीचं नुकसान होऊ शकतं. विशेषतः जर त्या भिंतींमध्ये वॉटरप्रूफिंग नसेल, तर भिंतीमधून नमी आत शिरते आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब करते. म्हणून, अशा भिंतींपासून टीव्ही दूर ठेवावा.
5. किचनजवळ
आजकाल ओपन किचनचा ट्रेंड आहे आणि काही लोक किचनजवळ टीव्ही लावतात. पण अन्न शिजवताना बाहेर पडणारी वाफ, तेलाचे थेंब, आणि उष्णता यामुळे टीव्हीची स्क्रीन आणि सर्किट खराब होतात. तेल व धुरामुळे टीव्ही चिकट होतो आणि त्याच्या आतील भागांवर परिणाम होतो. त्यामुळे टीव्ही नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवेशीर जागेवरच लावा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)