4GB/128GB, ट्रिपल कॅमेरा, 7400 हून कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच

| Updated on: May 10, 2021 | 12:03 AM

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Umidigi ने शानदार फीचर्सनी सुसज्ज असा ढासू स्मार्टफोन Umidigi A11 खूपच कमी किंमतीसह लाँच केला आहे.

4GB/128GB, ट्रिपल कॅमेरा, 7400 हून कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच
Umidigi A11
Follow us on

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Umidigi ने शानदार फीचर्सनी सुसज्ज असा ढासू स्मार्टफोन Umidigi A11 खूपच कमी किंमतीसह लाँच केला आहे. Umidigi च्या या एंट्री लेव्हल फोनची सर्वात महत्वाची बाब म्हणजे तो 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला असून त्याची किंमत 7400 रुपयांपेक्षा कमी आहे.

Umidigi A11 हा स्मार्टफोन जगभरात लाँच केला असून या स्मार्टफोनची किंमत 99.99 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. Umidigi कंपनीचे फोन भारतात विकले जातात. Umidigi A11 बियॉन्ड ड्रीम्स टॅगलाइनसह हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. (Umidigi A11 Launched globally in less than 7400 Rs)

स्पेसिफिकेशन्स

Umidigi A11 च्या किंमती आणि व्हेरिएंट्सबद्दल सांगायचे झाले तर हा फोन दोन व्हेरिएंट्समध्ये बाजारात सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत. 99.99 डॉलर्स म्हणजेच 7324 रुपये इतकी आहे. तसेच या फोनच्या 4 GB जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत. 119.99 डॉलर्स म्हणजेच 8,789 रुपये इतकी आहे.

हा फोन मिस्ट ब्लू आणि फॉरेस्ट ग्रे कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने UMIDIGI AirBuds U देखील बाजारात सादर केले असून त्याची किंमत $ 24.99 म्हणजेच 1830 रुपये इतकी आहे.

मोठी बॅटरी आणि शानदार डिस्प्ले

Umidigi A11 च्या स्पेसिफिकेशन डीटेल्सविषयी बोलायचे झाल्यास यात 6.53 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचं स्क्रीन रिझोल्यूशन 720 × 1600 पिक्सल इतकं आहे. अँड्रॉइड 11 वर आधारित, या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 25 प्रोसेसर आहे. Umidigi A11 मध्ये 5150mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड थर्मामीटरने सुसज्ज अशा या एंट्री-लेव्हल फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्यासोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे.

इतर बातम्या

नवीन स्मार्टफोन दीर्घकाळ टिकवायचा आहे? मग या टिप्स नक्की वाचा

Google Photos अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवून ठेवणार?

बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी

(Umidigi A11 Launched globally in less than 7400 Rs)