AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Photos अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवून ठेवणार?

आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक अधिकृत मेल पाठवला आहे,

Google Photos अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवून ठेवणार?
Google Photos
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Anish Bendre | Updated on: May 09, 2021 | 10:05 AM
Share

मुंबई : गूगल फोटोज (Google Photos) हा सध्या इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट फोटो स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. याचे एक कारण ते आहे की, हा प्लॅटफॉर्म आपल्याला हाय क्वालिटीमध्ये अनलिमिटेड आणि मोफत स्टोरेजचा पर्याय देतो. याचा अर्थ असा की आपल्या Android फोनवरून आपण उच्च प्रतीचे फोटो (हाय क्वालिटी) आणि व्हिडिओ थेट अपलोड करू शकता आणि तेही अनलिमिटेड. परंतु ही ऑफर केवळ या महिन्याच्या अखेपर्यंतच आहे. कारण आता कोणताही युजर या प्लॅटफॉर्मचा मोफत वापर करु शकणार नाही. गुगल अकाऊंटमध्ये युजर्सना केवळ 15 जीबी मोफत स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु आता युजर्सना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना सहा महिन्यांपूर्वी याबाबत एक मेलदेखील पाठवला होता, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील. (Google Photos unlimited storage offer ends, here some better options were you can store Photos)

मेलमध्ये पुढे नमूद केलं आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2021 पासून अस्तित्वात नसेल.

दरम्यान, आता अनेक युजर्सना प्रश्न पडला आहे की, फोटोज, व्हिडीओज किंवा इतर फाईल्स साठवून ठेवण्यासाठी गुगल फोटोजव्यतिरिक्त अजून कोणते पर्याय आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यायांबद्दलची माहिती देणार आहोत.

गुगल फोटोजना पर्याय कोणता?

iCloud (आयक्लाऊड)

तुम्ही आयफोन युजर्स असाल तर तुम्ही iCloud स्टोरेजचा वापर करु शकता. यामध्ये युजर्सना 5 जीबी स्टोरेज स्पेस मिळते. परंतु यानंतर तुम्हाला 50 जीबी स्टोरेजसाठी 0.99 डॉलर आणि 200 जीबी स्टोरेजसाठी 2.99 डॉलर इतकी रक्कम मोजावी लागेल.

Flickr (फ्लिकर)

यामध्ये तुम्हाला 1000 अनकंप्रेस्ड फोटो अपलोड करता येतील. परंतु त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड स्टोरेजसाठी दर महिन्याला 6 डॉलर्स द्यावे लागतील.

Dropbox (ड्रॉपबॉक्स)

यामध्ये तुम्हाला 2 जीबी मोफत स्टोरेज स्पेस मिळते. तर त्यानंतरच्या 2000 जीबी स्टोरेजसाठी दर महिन्याला 9.99 डॉलर द्यावे लागतील.

इतर बातम्या

आता Google Photos मोफत वापरता येणार नाही, अनलिमिटेड स्टोरेज ऑफर बंद

बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी

(Google Photos unlimited storage offer ends, here some better options were you can store Photos)

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील