Reliance Jio: रिलायन्स जिओकडून ‘या’ युजर्सना अनलिमिटेड कॉल अन्‌ डेटा, तुम्हीही या लाभासाठी पात्र आहात का बघा?

Reliance Jio: रिलायन्स जिओकडून ‘या’ युजर्सना अनलिमिटेड कॉल अन्‌ डेटा, तुम्हीही या लाभासाठी पात्र आहात का बघा?
Reliance-Jio
Image Credit source: File

रिलायन्स जिओची ही मोफत सेवा आसाम आणि ईशान्येतील पूरग्रस्त भागांसाठी आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना/युजर्सना त्यांच्या कुटुंबीयांशी तसेच त्याचे मित्र, आप्तेष्ट आदींशी संवाद साधता यावा, त्याची खुशाली विचारताय यावी, त्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी त्यांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

May 22, 2022 | 6:05 PM

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना चार दिवसांसाठी मोफत अमर्यादित कॉल व डेटा सेवा (Unlimited calls and data) देणार आहे. साहजिकच तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आपणही या सेवेसाठी पात्र आहोत की नाही? जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हालाही तब्बल चार दिवस वरील दोन्ही सेवांचा अगदी मोफत लाभ मिळणार आहे. दरम्यान, रिलायन्स जिओची ही मोफत सेवा आसाम आणि ईशान्येतील पूरग्रस्त (flooded) भागांसाठी आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना/युजर्सना त्यांच्या कुटुंबीयांशी तसेच त्याचे मित्र, आप्तेष्ट आदींशी संवाद साधता यावा, त्यांची खुशाली विचारताय यावी, त्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी त्यांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या माध्यमातून रिलायन्स जिओकडून (Reliance Jio) एक सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

कोणाला मिळणार लाभ

एका रिपोर्टनुसार, पात्र जिओ ग्राहकांना चार दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल आणि डेटाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये यूजर्सला दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. या मोफत प्लॅनची वैधता चार दिवसांची आहे. हा लाभ आसाममधील पूरग्रस्त जिल्हे डिम हासाओ, कोरबी आंग्लॉन्ग ईस्ट, कोरबी आंग्लॉन्ग वेस्ट, होजाई आणि कॅचरच्या युजर्सना दिला जाणार आहे. ‘टेलिकॉम टॉक’मधील वृत्तानुसार, जिओने यासाठी आसाममधील पात्र ग्राहकांना या योजनेबाबतचा संदेशही पाठवला आहे.

MyJio अॅपमध्ये प्लॅनची माहिती

अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे दुरसंचार क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण झाल्याचा संदेशात म्हटले आहे, त्यामुळे कंपनीकडून COMPLIMENTARY 4-DAY UNLIMITED PLAN लागू करण्यात आली आहे. तुम्ही देखील या पूरग्रस्त भागात राहत असाल तर तुम्ही या मोफत अमर्यादित प्रीपेड योजनेसाठी पात्र आहात. तुम्हाला हा लाभ मिळाला आहे की नाही हे तुम्ही MyJio अॅपमध्ये तपासू शकता. MyJio अॅपमध्ये, तुम्हाला वरच्या डाव्या कोपऱ्यात‍ हॅम्बर्गर मेनू निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला हा चार दिवसांचा अमर्यादित प्लॅन मिळाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही My Plans वर क्लिक करू शकता. आसाममध्ये, दिमा हासाओ, कार्बी आंग्लॉन्ग ईस्ट, कार्बी आंग्लॉन्ग वेस्ट, होजाई आणि कचार या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना रिलायन्स जिओकडून ही ऑफर देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें