Vi ने लाँच केला नवीन हायब्रीड प्रीपेड रिचार्ज प्लॅन, ज्यात वापरकर्त्यांना मिळेल 365 दिवसांची वैधता आणि अनेक फायदे

Vi ने 365 दिवसांच्या वैधतेसह एक हायब्रीड प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. यामध्ये भारत आणि परदेशात कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळते. हा प्लॅन विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

Vi ने लाँच केला नवीन हायब्रीड प्रीपेड रिचार्ज प्लॅन, ज्यात वापरकर्त्यांना मिळेल 365 दिवसांची वैधता आणि अनेक फायदे
Vodafone Idea
Image Credit source: VI
| Edited By: | Updated on: May 07, 2026 | 10:44 AM

व्होडाफोन आयडिया (Vi) या टेलिकॉम कंपनीने एक विशेष हायब्रीड प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो भारतात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. 4 हजार 997 रुपये किंमतीचा हा प्लॅन वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या आणि एकाच रिचार्जमध्ये सर्व फिचर्स मिळवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. चला तर मग आजच्या लेखात या नवीन प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

365 दिवसांच्या वैधतेसह आकर्षक लाभ उपलब्ध

Vi च्या या हायब्रीड प्लॅनची ​​किंमत 4 हजार 997 रुपये असून त्याची वैधता 365 दिवस किंवा एक वर्षाची आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना भारतात वापरण्यासाठी दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. ज्या वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करणे टाळायचे आहे आणि एकाच प्लॅनमध्ये वर्षभराचे फायदे हवे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन आदर्श आहे. त्याची दीर्घ वैधता आणि दररोज मिळणाऱ्या डेटामुळे हा पॅक एक ऑल इन वन सॉल्यूशन बनला आहे.

परदेशात कॉलिंग आणि डेटा सुविधा

या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्यं म्हणजे त्याचे आंतरराष्ट्रीय फायदे. Vi ने या रिचार्ज प्लॅनची याची दोन सेटमध्ये विभागणी केली आहे. सेट 1 मध्ये समाविष्ट असलेल्या 59 देशांमध्ये वापरकर्त्यांना 100 मिनिटांचे आउटगोइंग आणि इनकमिंग कॉल्स मिळतात, तर सेट 2 मध्ये समाविष्ट असलेल्या 65 देशांमध्ये 50 मिनिटांचे आउटगोइंग कॉल्स मिळतात. मिनिटे संपल्यानंतर, कॉलसाठी प्रति मिनिट 10 रूपये शुल्क आकारले जाईल. डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, सेट 1 मधील देशांमध्ये 5 जीबी आणि सेट 2 मधील देशांमध्ये 1जीबी आंतरराष्ट्रीय डेटा उपलब्ध आहे. यूएईला 25 मिनिटांचे कॉलिंग देखील दिले जाते, परंतु त्यात डेटा समाविष्ट नाही. जे लोक परदेशात असतानाही संपर्कात राहू इच्छितात त्यांच्यासाठी हे वैशिष्ट्यं खूप उपयुक्त आहे.

एअरटेलला व्हाआयच्या या प्लॅनमुळे मिळेल टक्कर

Vi ची ही योजना एअरटेलच्या नुकत्याच सादर केलेल्या ग्लोबल IR पॅकशी थेट स्पर्धा करत असल्याचे दिसते. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कंपन्या आता आंतरराष्ट्रीय वापरकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या प्लॅनवर लक्ष केंद्रित करत आहेत. तर हे रिचार्ज प्लॅन विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे व्यवसाय, प्रवास किंवा इतर कारणांसाठी वारंवार परदेशात प्रवास करतात. एकाच रिचार्जमध्ये भारत आणि परदेशात दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटीची उपलब्धता हे या योजनेचे वैशिष्ट्यं आहे. अशा वापरकर्त्यांसाठी ही योजना एक सोयीस्कर आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकते.

Follow Us