AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री त्रिशा कृष्णनने अखेर थलपती विजय यांच्यासाठी वाढदिवसाची पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी दिवसभर चाहते तिच्या पोस्टची प्रतीक्षा करत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस
Thalapathy Vijay and Trisha KrishnanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2026 | 8:40 AM
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी देशभरातील कलाकारांकडून आणि राजकारण्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र सोशल मीडियावर चाहते अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या पोस्टची प्रतीक्षा करत होते. दरवर्षी त्रिशा तिच्या इन्स्टाग्रामवर विजय यांच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत आवर्जून शुभेच्छा देते. मात्र यावर्षी तिने 22 जून रोजी कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. यामुळे त्रिशा आणि विजय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. अखेर मंगळवारी संध्याकाळी त्रिशाने खास फोटो पोस्ट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्रिशाने विजय यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

विजय यांनी त्यांचा 52 वा वाढदिवस त्रिशासोबत साजरा केला आणि या सेलिब्रेशनची एक झलक तिने या फोटोद्वारे दाखवली आहे. त्रिशाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये विजय प्रिंटेड शर्टमध्ये दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. त्यांच्या बाजूला बसलेली त्रिशा त्यांच्याकडे बघत मनमोकळेपणाने हसत आहे. त्रिशाची नजर विजय यांच्यावरच खिळल्याचं यात पहायला मिळतंय. विजय यांच्यासमोर वाढदिवसाचे एक-दोन नव्हे तर पाच केक आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्रिशाने लिहिलं, ‘ज्या व्यक्तीमुळे हे सर्व सार्थक ठरतं, त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ यासोबत तिने हृदयाचा आणि एव्हिल आयचा इमोजी पोस्ट केला आहे. या कॅप्शनमध्ये तिने ‘00.00’ असंदेखील लिहिलं आहे. यामुळे चाहत्यांना असा संकेत मिळाला की रात्री बाराच्या ठोक्याला त्रिशाने विजय यांचा वाढदिवस साजरा केला.

त्रिशाची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Trish (@trishakrishnan)

त्रिशा गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर विजय यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. 2023 मध्ये तिने लोकेश कनगराजच्या ‘लिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बर्फाळ ठिकाणी काढलेला त्यांचा एक फोटो पोस्ट केला होता. याच चित्रपटामुळे अनेक वर्षांनंतर ते पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले होते. 2024 मध्ये तिने विजय यांच्यासोबतचा एक मिरर सेल्फी पोस्ट केला होता. गेल्या वर्षी त्रिशाच्या पाळीव श्वानासोबत खेळतानाचा विजय यांचा फोटो तिने शेअर केला होता. मात्र यावर्षी 22 जून रोजी तिचा कोणताही पोस्ट सोशल मीडियावर न दिसल्याने चाहत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली होती.

त्रिशा आणि विजय हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली होती. या अर्जात तिने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी हवा मिळाली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?