AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुलं घेतली, मिठी मारली, डान्सही केला… तिनेच केतनला खोल दरीत ढकललं ! नवी अपडेट समोर

केतनला लोहगडावरून धक्का देणाऱ्या सियाचे, तिचा प्रियकर चेतनसोबत वर्षभरापासून नातं होतं. तो मार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रुट्सचा व्यवसाय करत असे. त्यांची पहिली भेट व्यवसायाच्या निमित्ताने झाली होती.

फुलं घेतली, मिठी मारली, डान्सही केला... तिनेच केतनला खोल दरीत ढकललं !  नवी अपडेट समोर
Ketan Murder Updates
| Updated on: Jun 24, 2026 | 8:51 AM
Share

राजा रघुवंशीनंतर आता केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याचं नाव देशभरात चर्चेत आहे. देशाच्या एखाद्या कोपऱ्यात आणखी एखादी सोनम रघुवंशी लपली असेल याचा कोणीच विचारही केला नव्हता. केतनने आपली होणारी पत्नी सिया (Siya goyal) हिला तिच्या वाढदिवसापूर्वी एक जबरदस्त सरप्राईज दिलं होतं; पण त्याच केतनचा सियाने दुसऱ्या एका पुरुषासाठी बळी घेतला. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओवरून केतन आणि सियाची कहाणी एखाद्या परीकथेसारखी वाटते. गाडीत बसले असताना केतनने आपल्या हातांनी सियाचे डोळे झाकले, तिला सुंदर फूल भेट दिलं. त्याची भेट पाहून, तिच्या चेहऱ्यावर जे हावभाव दिसतात, ते पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू उमटेल. पण याच हास्यामागे किती क्रूर चेहरा आणि काय करण्याचं प्लानिग होतं, याचा कोणीच विचारही करू शकत नाही. त्याच सियाच्या मनात एका खुनाचा भयंकर कट शिजत होता, यावर कोणाचाच विश्वासही बसणार नाही.

केतनचं प्रेम पाहूनही सियाच मन द्रवलं नाही

समोर आलेल्या व्हिडीओत केतन आणि सियाचे प्रेमाचे काही क्षण दिसतात. केतनने दिलेली फुलं पाहून तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला; जसं काही संपूर्ण जगच तिला गवसलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तिच्या मनात दडलेल्या द्वेषाची अजिबात जाणीव करून देत नव्हता. त्यानंतर केतनकडून मिळालेल्या आणखी एका सरप्राईजमुळे सिया खूप आनंदी झाली, जणू तकी हवेत तरंगत्ये. केतनने एक बटण दाबून, गाडीचे ‘सनरूफ’ उघडताच, त्यावर असलेली ती सुंदर फुलांची सजावट पाहून सियाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता त्याला मिठी मारली.

सियाचा खरा चेहरा केतनला कळलाच नाही

सियाला मिठी मारताना केतनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण केतनचं ज्या मुलीवर जीवापाड प्रेम होतं, तीच सिया जीव घेण्याच्या तयारीत होती, याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. सियाच्या निरागस चेहऱ्यामागे एक कपटी स्त्री दडलेली आहे हे ओळखण्यात तो सपशेल अपयशी ठरला; सियाने दाखवलेल्या त्या खोट्या व्यक्तिमत्त्वालाच केतनने तिचं खरं सत्य मानलं. सिया त्याला जे काही दाखवत होती, तेच पूर्ण सत्य आहे असं केतनला वाटत होतं. सियासारखी होणारी पत्नी मिळाल्यामुळे आपले आयुष्य एखाद्या परीकथेसारखं झालंय अशी भावना त्याच्या मनात होत.. पुढे काय संकट आपल्यावर चालून येणार आहे, याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.

सोबत डान्सही केला, मग त्याच सियाने केतनचा जीव घेतला

आणखी एका व्हिडीओमधये सिया आणि केतन सेलिब्रेशन करताना दिसले, केतना तिला एकाक2फेमध्ये घेऊन गेला, लाइव्ह म्युझिक सुरू असताना, त्याने तिवा प्रपोजही केलं. यावेळी सिया खूप खुश होती. एखाद्या मुलीला आपला जीवनसाथी मिळाल्यावर जो आनंद होतो, तोच तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्यानंतर सिया आणि केतन यांनी डान्सही केला. मात्र नंतर जे घडलं ते अतिशय भयानक होतं.

लोहगड किल्ल्यावरून केतनला दिला धक्का

सियाने वाढदिवसापूर्वीच्या ‘सरप्राईज’चे निमित्त करून केतनलाच नाही, तर तिचा कथित प्रियकर चेतनलाही लोहगड किल्ल्यावर बोलावलं होतं. संशय येऊ नये म्हणून चेतनने आपला मोबाईल फोन कोंढव्यातील घरीच ठेवला होता. एवढंच नव्हे तर आपली ओळख लपवण्यासाठी त्याने कपडेही बदलले होते. कडक उन्हात लोहगडाकडे जाताना, चेतन ‘हुडी’ (hoodie) घालून, हेडफोन्स लावून चेहरा झाकत चावतान दिसल्याचे CCTV फुटेज पोलिसांना मिळालं.

18 जूनला लोहागड किल्ल्यावर केतन जेव्हा त्याच्या मोबाईलवरून फोटो काढत होता, तेव्हाच सियाने त्याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर, केतनचा पाय घसरून तो खाली पडला, असा दावा करत तिने स्वतःच पोलिसांना फोन केला. पोलीस आणि कुटुंबीय तातडीने घटनास्थळी पोहोचले. अशा प्रकारे, सिया गोयलचा ‘प्लॅन बी’ यशस्वी झाली आणि तिने केतनचा बळी घेतला.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना