.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शास्त्रज्ञांची कमाल, आता स्वप्न रेकॉर्ड होणार, बनवले असे मशीन की स्वप्नांचे होणार व्हिडिओ रेकॉर्डीग

Device to Record Human Dreams: जपानमधील संशोधकांनी हे उपकरण तयार केल्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यक्तीच्या मनातील रहस्य समजू शकणार आहे. हे मशिन ब्रेन इमेजिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसने (AI) मिळून केले आहे.

शास्त्रज्ञांची कमाल, आता स्वप्न रेकॉर्ड होणार, बनवले असे मशीन की स्वप्नांचे होणार व्हिडिओ रेकॉर्डीग
Human Dreams
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 28, 2024 | 12:26 PM
Share

New Device To Record Human Dreams: स्वप्न प्रत्येक जणाला येत असतात. परंतु झोपेत पाहिलेली स्वप्न पूर्ण होणे अवघड असते. अनेक जण रात्री पहिलेले स्वप्न विसरुन जातात. परंतु स्वप्न विसरण्यास आता बाय, बाय करता येणार आहे. तुम्ही पहिलेले स्वप्न रेकॉर्ड होणार आहे. मग सकाळी उठून स्वप्न काय पाहिले? त्याचा व्हिडिओ पाहता येणार आहे. जपानमधील शास्त्रज्ञांनी स्वप्न रेकॉर्ड करणारी मशीन बनवली आहे. या उपकरणाचे संशोधन क्रांतीकारी मानले जात आहे.

काय हे तंत्रज्ञान

संशोधकांनी मेंदूच्या एक्टिव्हिटीज समजून घेण्यासाठी प्रगत न्यूरल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये स्वप्ने रेकॉर्ड करण्यासाठी मेंदूच्या सर्व क्रिया रेकॉर्ड केल्या जातात. विशेषत: झोपेच्या वेळी सर्वात जास्त रॅपिड आय मूव्हमेंट असते. एआय वापर करुन मेंदूच्या लहरींचे नमुने ड्रीम सिक्वेन्समध्ये रूपांतरित केले जातात. त्यामुळे ते पुन्हा दाखवता येतात. या यंत्रामुळे संशोधकांना स्वप्नांच्या अभ्यासातील नवीन गोष्टी समजण्यास मदत होऊ शकते.

वैद्यकीय उपचारासाठी होणार फायदा

तज्ञांच्या मते, हे उपकरण केवळ वैयक्तिक अनुभव समजून घेण्यास मदत करणार नाही तर मानसिक आरोग्य अन् समस्यांचे विश्लेषण यामुळे होणार आहे. स्वप्न रेकॉर्डिंग यंत्राच्या मदतीने डॉक्टर रुग्णांची मानसिक स्थिती आणि भावनिक आव्हाने चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. हे उपकरण क्रांतीकारी ठरणार आहे. परंतु संशोधकांना रेकॉर्ड केलेल्या व्यक्तीची माहिती सुरक्षित राहील आणि तिचा वापर केवळ संशोधन किंवा वैद्यकीय हेतूंसाठी केले जाईल, हे निश्चित करावे लागणार आहे.

जपानमधील संशोधकांनी हे उपकरण तयार केल्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यक्तीच्या मनातील रहस्य समजू शकणार आहे. हे मशिन ब्रेन इमेजिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसने (AI) मिळून केले आहे. मानवाच्या महत्वपूर्ण संशोधनात हे संशोधन समजले जाणार आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर