Vivo चा 100x सुपर झूम असलेला स्मार्टफोन लाँच, फीचर्स काय, किंमत किती? वाचा …
विवोने Vivo T4 Ultra हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. विवोचा हा फोन १००x सुपर झूम फीचरसह येतो. या फोनमधील फीचर्स काय आहेत आणि त्याची किंमत काय असेल ते जाणून घेऊयात.

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विवोने Vivo T4 Ultra हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. विवोचा हा फोन १००x सुपर झूम फीचरसह येतो. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये दमदार फीचर्स आहेत. हा Vivo फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo T3 Ultra चा अपग्रेड असेल. या फोनमधील फीचर्स काय आहेत आणि त्याची किंमत काय असेल ते जाणून घेऊयात.
Vivo T4 Ultra 5G ची वैशिष्ट्ये
Vivo T4 Ultra या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर आहे. तसेच यात १२GB RAM आणि ५१२GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा Vivo फोन अँड्रॉइड १५ वर आधारित FuntouchOS १५ वर काम करतो. या फोनमध्ये Google Gemini चे AI फीचर्स आहेत, ज्यामध्ये Circle to Search, AI Translate सारखे खास फीचर्स आहेत.
Vivo T4 Ultra मध्ये ५५००mAh बॅटरी आहे. जी ९०W टर्बो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन ड्युअल ५G सिम कार्ड, वायफाय, ब्लूटूथ ५.४, OTG, GPS, NFC सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येतो. या फोनमध्ये IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स फीचर आहे.
कॅमेरा
Vivo T4 Ultra या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात ५० एमपीचा मुख्य ओआयएस कॅमेरा आहे. तसेच ५० एमपीचा पेरिस्कोपिक टेलिफोटो कॅमेरा आहे, जो 100x सुपर झूमला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनमध्ये ८ एमपीचा वाइड अँगल कॅमेरा उपलब्ध असेल. त्याचबरोबर या फोनमधये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 एएमपीचा फ्रंच कॅमेरा देण्यात आलेला आहे.
विवोच्या या फोनमध्ये ६.६७ इंच १.५K क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट फीचर आहे. तसेच हा फोन ५००० निट्स पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
Vivo T4 Ultra ची किंमत
विवो कंपनीने हा Vivo फोन ३ स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. हा फोन ८ जीबी रॅम + २५६ जीबी, १२ जीबी रॅम + २५६ जीबी आणि १२ जीबी रॅम + ५१२ जीबी मध्ये येतो. या फोनची सुरुवातीची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तसेच इतर दोन व्हेरिएंट अनुक्रमे ३९,९९९ आणि ४१,९९९ रुपयांना मिळतात.
Vivo T4 Ultra या फोनचा पहिला सेल १८ जून रोजी दुपारी १२ वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सुरु होणार आहे. हा फोन Meteor Grey आणि Phoenix Gold रंगांमध्ये उपलब्ध आहे.
