Vivo X200 FE VS OnePlus 13S मधील ‘हे’ नविन फिचर्स जाणून घ्या आणि नंतरच खरेदी करा!

भारतीय ग्राहकांना मोठे फोन आवडतात, पण छोट्या आकारात दमदार वैशिष्ट्ये देणारे फोनही आता पसंत होत आहेत. Vivo आणि OnePlus हे दोन्ही फोन कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप प्रकारात क्रांती घडवू शकतात...

Vivo X200 FE VS OnePlus 13S मधील हे नविन फिचर्स जाणून घ्या आणि नंतरच खरेदी करा!
| Edited By: | Updated on: May 11, 2025 | 3:30 PM

स्मार्टफोन प्रेमींना आता मोठ्या स्क्रीनपेक्षा जास्त महत्त्व परफॉर्मन्स आणि पोर्टेबिलिटीचं वाटू लागलं आहे. हे लक्षात घेऊन Vivo आणि OnePlus यांनी दमदार कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन बाजारात उतरवण्याची तयारी केली आहे. Vivo X200 FE आणि OnePlus 13S हे दोन्ही फोन त्यांच्या लाँचपूर्व वैशिष्ट्यांमुळे आधीच चर्चेत आले आहेत. हे मॉडेल्स केवळ डिझाइनमध्येच नव्हे, तर बॅटरी, कॅमेरा आणि प्रोसेसरच्या ताकदीतही एकमेकांना जबरदस्त टक्कर देतात.

Vivo X200 FE : Vivo X200 FE हा फोन छोट्या आकारात मोठा परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यात 6.31-इंचाचा 1.5K LTPO OLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेटसह गेमिंग आणि व्हिज्युअल अनुभव अधिक सुंदर होतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ किंवा नवीन 9400e चिपसेट असल्याची शक्यता आहे, जी फोनला जबरदस्त स्पीड देते.

त्यासोबत, 6,500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसारखी सुविधा म्हणजे दिवसभर फोन वापरूनही बॅटरी संपणार नाही. 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, AI-आधारित फोटोग्राफी फीचर्स आणि Zeiss ऑप्टिक्सचा सपोर्ट यामुळे फोटो प्रेमींसाठी हा एक परफेक्ट फोन ठरू शकतो.

OnePlus 13S : दुसरीकडे, OnePlus 13S हा Snapdragon 8 Gen 3 Elite चिपसेटसह येणारा दमदार फोन आहे. यात 6.32-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि आकर्षक रंग पर्यायांसह स्टायलिश लूक आहे. याच्या 6,260mAh बॅटरीसाठी 80W फास्ट चार्जिंग दिलं गेलं असून, कॅमेऱ्याची ताकदही Vivo इतकीच आहे 50MP मुख्य आणि टेलिफोटो कॅमेऱ्यांसह.

कोणता फोन निवडाल?

Vivo X200 FE हा फोन मोठ्या बॅटरी, अधिक चार्जिंग स्पीड आणि AI कॅमेरा फिचर्समुळे पुढे असताना, OnePlus 13S ची सॉफ्टवेअर एक्सपीरियन्स, भारतीय वापरकर्त्यांसाठी खास केलेले फीचर्स आणि डिझाइन प्रेमींसाठी आकर्षक आहे. दोघांमध्येही IP रेटिंग, मोठे RAM व स्टोरेज ऑप्शन्स, आणि फ्लॅगशिप फिचर्स आहेत. सप्टेंबरच्या सुमारास हे दोन्ही फोन भारतात ग्राहकांच्या हाती येण्याची शक्यता आहे. आणि मग खरा निर्णय ग्राहकांचा!