AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३० हजारांत असा फोन ज्यात DSLR चा अनुभव मिळेल ? जाणून घ्या कसे!

best camera phone under 30000, budget smartphone camera, poco x7 pro, realme p3 ultra, iqoo neo 10r, oppo f29 pro, oneplus nord 4, mobile photography, बेस्ट कॅमेरा फोन, बजेट स्मार्टफोन कॅमेरा, मोबाईल फोटोग्राफी,

३० हजारांत असा फोन ज्यात DSLR चा अनुभव मिळेल ? जाणून घ्या कसे!
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 3:41 PM
Share

आजकाल नवा फोन घेताना सर्वात जास्त लक्ष दिलं जातं ते कॅमेऱ्यावर. पूर्वी जसे फक्त कॉलसाठी फोन वापरले जायचे, तसं आता राहिलेलं नाही. फोटो काढणं, व्हिडीओ बनवणं आणि आठवणी जपणं यासाठी फोनच महत्त्वाचा झाला आहे. पण भारी फोटो काढायचा म्हणजे महागडा फोन किंवा DSLR घ्यावा लागतो, ही समजूत आता बदलली आहे. ३० हजारांच्या आतही भन्नाट फोटो काढणारे स्मार्टफोन बाजारात आले आहेत.

Poco X7 Pro 5G : २४,९९९ रुपयांना मिळणारा Poco X7 Pro 5G हा फोन त्याच्या कॅमेऱ्यासाठी खूप लोकप्रिय आहे. यात ५०MP चा Sony LYT-600 सेन्सर आहे आणि OIS-EIS सपोर्टही आहे, त्यामुळे हलत्या परिस्थितीतही फोटो स्थिर येतात. २०MP फ्रंट कॅमेरा आणि मोठी 6550mAh बॅटरी यामुळे हे एक दमदार पॅकेज ठरतं.

Realme P3 Ultra 5G : २६,९९९ रुपयांचा Realme P3 Ultra 5G फोनही उत्तम कॅमेऱ्यासह येतो. यात OIS सह ५०MP चा Sony IMX896 सेन्सर दिला आहे. ८MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १६MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोठी 6000mAh बॅटरी आणि Curved Display यामुळे हा फोन आणखी आकर्षक वाटतो.

iQOO Neo 10R : २६,९९८ रुपयांचा iQOO Neo 10R खास गेमर्ससाठी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी आहे. यात Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर, ५०MP OIS सेन्सर आणि ८MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. ३२MP फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीप्रेमींनाही हा फोन आकर्षित करतो.

Oppo F29 Pro 5G आणि OnePlus Nord 4 : २७,९९९ रुपयांचा Oppo F29 Pro 5G हा फोन पाण्यापासून सुरक्षित असण्याबरोबरच चांगल्या कॅमेऱ्याने सज्ज आहे. ५०MP चा मुख्य कॅमेरा आणि १६MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. दुसरीकडे, २९,९९९ रुपयांचा OnePlus Nord 4 हा एक बॅलन्सड फोन आहे. Snapdragon 7 Plus Gen 3 प्रोसेसर आणि उत्तम AMOLED डिस्प्ले यामुळे याला चांगली मागणी आहे.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.