व्होडाफोन आयडियाने लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स, ज्यात रिचार्जवर मिळणार मोफत स्पॉटिफाय प्रिमियम

तुम्हाला जर म्युझिक स्ट्रीमिंगसाठी स्पॉटिफाय प्रीमियम वापरायचे असेल तर Vi चे नवीन प्रीपेड प्लॅन्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग या प्रीपेड प्लॅनची किंमत जाणू

व्होडाफोन आयडियाने लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स, ज्यात रिचार्जवर मिळणार मोफत स्पॉटिफाय प्रिमियम
| Edited By: | Updated on: Aug 05, 2026 | 4:33 PM

व्होडाफोन आयडियाने (Vi) भारतात तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्पॉटिफाय प्रीमियमचे फायदे वापरकर्त्यांना मिळणार आहे. याव्यतिरिक्त काही प्लॅन्सवर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटीच्या फायद्याचा लाभ घेता येणार आहे. तर या सर्व नवीन प्लॅन्सची वैधता 28 दिवसांची आहे. चला तर मग या 3 नवीन प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती आणि त्यातील फायदे जाणून घेऊयात.

तुम्हाला व्होडाफोन आयडियाच्या या तीन नवीन प्लॅन्समध्ये काय मिळेल?

Vi ने 435 रुपये, 250 रुपये आणि 230 रुपये या किमतीचे तीन नवीन प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीने या सर्व प्लॅन्समध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्पॉटिफाय प्रीमियमचा समावेश केला आहे. यामुळे ग्राहकांना जाहिरातमुक्त त्यांची आवडती गाणी ऐकण्याची, ऑफलाइन डाउनलोड्स करण्याची आणि उच्च-गुणवत्तेच्या ऑडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेण्याची सुविधा या रिचार्ज प्लॅन्सवर मिळणार आहे. तिन्ही प्लॅन्सची वैधता 28 दिवसांची असून यामध्ये कॉलिंग आणि इतर सुविधादेखील उपलब्ध आहेत.

डेटा, कॉलिंग आणि ओटीटी फायदे

तर व्होडाफोन आयडियाच्या 435 रुपयांच्या Vi नॉनस्टॉप हीरो प्लॅनमध्ये अनलिमिटेड 4G किंवा 5G डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि JioHotstar मोबाईल ॲक्सेस मिळतो.

250 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस मिळतात. सोबतच स्पॉटिफाय प्रीमियमचा ॲक्सेस मिळतो.

230 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 जीबी हाय-स्पीड डेटासोबत स्पॉटिफाय प्रीमियम आणि JioHotstar, Zee5, SonyLIV, FanCode व Lionsgate Play सह 20 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस मिळतो.

स्पॉटिफाय प्रीमियम कसे मिळवायचे?

Vi च्या म्हणण्यानुसार ग्राहक या पात्र रिचार्ज प्लॅनपैकी एकाने रिचार्ज करून आणि Vi ॲपमधील ‘ॲक्टिव्ह सर्व्हिसेस’ अंतर्गत ‘क्लेम बेनिफिट्स’ विभागात जाऊन स्पॉटिफाय प्रीमियम सक्रिय करू शकतात. त्यानंतर वापरकर्ते त्यांच्या विद्यमान स्पॉटिफाय खात्यासह साइन इन करू शकतात किंवा प्रीमियम सक्रिय करण्यासाठी नवीन खाते तयार करू शकतात. स्पॉटिफाय प्रीमियम वापरकर्त्याच्या Vi रिचार्ज सायकलशी जोडले जाईल आणि त्यांच्या पुढील पात्र प्लॅनवर रिचार्ज केल्यावरही ते सुरू राहील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us