काही महिन्यात ‘या’ स्मार्टफोन्समधून WhatsApp बंद होणार

| Updated on: Sep 29, 2019 | 12:24 PM

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅप आता काही फोनमधून गायब (Whatsapp ban in old version phone) होणार आहे.

काही महिन्यात या स्मार्टफोन्समधून WhatsApp बंद होणार
Follow us on

मुंबई : जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅप आता काही फोनमधून गायब (Whatsapp ban in old version phone) होणार आहे. आयओएस 8 आणि अँड्रॉईड 2.3.7 किंवा जुनी ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हॉट्सअॅप बंद (Whatsapp ban in old version phone) केले जाणार आहे. या सर्व जुन्या फोनमधील कॅपॅबिलीटी 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपणार आहे.

ज्या फोनमध्ये ही जुनी ऑपरेटिंग सिस्टम असेल त्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. तसेच ज्या फोन जुन्या सिस्टम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप आहे ते सुरु राहिल. पण जर ते uninstall केले आणि पुन्हा install करण्याचा प्रयत्न केला. तर ते install होणार नाही. WABetainfo ने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

दिेलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत हा निर्णय अमलात येईल. याचा अर्थ या तारखेनंतर आयओएस 8 आणि अँड्रॉईड 2.3.7 किंवा इतर जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअॅप अॅक्सेस होणार नाही. 1 जुलै 2019 नंतर मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध नसेल. तर 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज फोनमध्येही व्हॉट्सअॅप बंद केले जाईल.

यापूर्वीही कंपनीने अँड्रॉईड फोन 2.3.7 आणि त्यापेक्षाही जुन्या सिस्टम तसेच आयफोन 7 मधूनही व्हॉट्सअॅप बंद करण्याची सूचना दिली होती.

दरम्यान, जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार असल्यामुळे युजर्स नवी सिस्टमचे फोन खरेदी करतील. त्यामुळे फोनच्या खरेदीत वाढ होईल असं म्हटलं जात आहे.