अँड्रॉयड युजर्सना WhatsApp मध्ये कॅमेरा इंटरफेस मिळणार, ग्रुप अ‍ॅडमिनसाठी नवीन फीचर्स

| Updated on: Dec 16, 2021 | 10:45 PM

व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या अँड्रॉइडवरील अॅपमध्ये नवीन अपडेट्स आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडील माहितीनुसार, अॅप नवीन इन-अॅप कॅमेरा इंटरफेसची चाचणी करताना पाहायला मिळाले आहे.

अँड्रॉयड युजर्सना WhatsApp मध्ये कॅमेरा इंटरफेस मिळणार, ग्रुप अ‍ॅडमिनसाठी नवीन फीचर्स
WhatsApp
Follow us on

WhatsApp Latest Android Update : व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या अँड्रॉइडवरील अॅपमध्ये नवीन अपडेट्स आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडील माहितीनुसार, अॅप नवीन इन-अॅप कॅमेरा इंटरफेसची चाचणी करताना पाहायला मिळाले आहे. असे मानले जाते की, नवीन बदलामध्ये, फ्लॅश शॉर्टकटची स्थिती बदलली आहे आणि स्विच कॅमेरा बटण पुन्हा डिझाइन केले आहे. (WhatsApp Spotted Testing New Camera Interface, may extend Delete for Everyone to group admins)

याशिवाय, व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी एका फीचरवरही काम करत आहे, ज्यामुळे ग्रुपमधील अॅडमिन्स डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन पर्यायासह कोणताही विशिष्ट मेसेज ग्रुपमधून डिलीट करु शकतात. हे फीचर अजून रोलआउट केले गेलेले नाही, अॅपवर या फीचरची चाचणी सुरु असल्याचे आढळून आले आहे. हे फीचर ग्रुप अॅडमिन्सना स्पॅम आणि चुकीची माहिती कंट्रोल करण्यास मदत करेल.

व्हॉट्सअॅप बीटा ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार WhatsApp ने लेटेस्ट Android बीटा 2.22.1.2 जारी केले गेले आहे. ज्यात रीडिझाईन केलेल्या अॅपमधील कॅमेरा डेव्हलपमेंटबद्दल माहिती देण्यात आली आहे. नवीन अपडेट अद्याप बीटा टेस्टर्स साठी लाईव्ह झालेलं नाही, मात्र ते इंटर्नल टेस्टिंगचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

अँड्रॉयड युजर्सना WhatsApp मध्ये नवीन कॅमेरा इंटरफेस मिळणार

WABetaInfo ने WhatsApp वर नवीन डिझाइन करण्यात आलेल्या कॅमेऱ्याबद्दल माहिती देताना एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यात तळाशी डावीकडून वरच्या उजव्या कोपऱ्यात फ्लॅश शॉर्टकट दिसतोय आणि स्विच कॅमेरा बटणावर गोलाकार सावलीसारखा आयकॉनही आहे. फ्लॅश शॉर्टकट बदलून, नवीन अॅपमधील कॅमेरा इंटरफेस तळाशी-डाव्या कोपऱ्यातून तुमच्या अलीकडच्या फोटोंमध्ये अॅक्सेस प्रदान करतो. दरम्यान, हा अपडेटेड कॅमेरा व्हॉट्सअॅपवर कधी पाहता येईल, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नवीन कॅमेराव्यतिरिक्त, WABetaInfo ने स्वतंत्रपणे सांगितले आहे की व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप अॅडमिन्सना डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन पर्याय देईल. व्हॉट्सअॅप युजर्सना वैयक्तिक चॅटमधील मेसेज तसेच प्रत्येकासाठी डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन फीचर वापरून ग्रुपमधला मेसेज प्रत्येकासाठी हटविण्याची परवानगी देईल. तथापि, अद्याप ग्रुप अॅडमिन्सना त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना डिलीट मेसेज फॉर एव्हरीवन सुविधेचा अॅक्सेस देण्यास सक्षम केलेलं नाही.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(WhatsApp Spotted Testing New Camera Interface, may extend Delete for Everyone to group admins)