जाणून घ्या… कोणते अॅप तुमच्या फेसबुकवर नजर ठेवून आहेत!

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक. फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अनेकजण कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर फेसबुक वापरत असताना, इतर वेबसाईट्स किंवा अॅप्स हाताळताना फेसबुक अॅक्सेस देतात. मात्र, यामुळे अनेकदा आपल्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होऊ शकतो. याचं कारण फेसबुकवरील आपली माहिती या वेबसाईट्स किंवा अॅप्स सहज पाहू शकतात. कुठल्या […]

जाणून घ्या... कोणते अॅप तुमच्या फेसबुकवर नजर ठेवून आहेत!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक. फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अनेकजण कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर फेसबुक वापरत असताना, इतर वेबसाईट्स किंवा अॅप्स हाताळताना फेसबुक अॅक्सेस देतात. मात्र, यामुळे अनेकदा आपल्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होऊ शकतो. याचं कारण फेसबुकवरील आपली माहिती या वेबसाईट्स किंवा अॅप्स सहज पाहू शकतात.

कुठल्या अॅप्स किंवा वेबसाईट्सना तुम्ही परवानगी दिलीय?

तुम्ही कुठल्या अॅप्स किंवा वेबसाईट्सना फेसबुक अॅक्सेस दिलंय, हे माहिती करुन घेण्यासाठी फेसबुक लॉग इन करा. त्यानंतर फेसबुकच्या सेटिंगमध्ये जा. तिथे तुम्हाला ‘अॅप्स अँड वेबसाईट्स’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

‘अॅप्स अँड वेबसाईट्स’वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय दिसतील. त्यात अॅक्टिव्ह, एक्स्पायर्ड आणि रिमोव्ह्ड असे पर्याय असतील. यातील अॅक्टिव्ह पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या अॅप्स किंवा वेबसाईट्सना माहिती अॅक्सेसची परवानगी दिलीय, ते कळू शकेल.

हॉटस्टार, ट्रू कॉलर यांसारख्या अॅप्सचा सर्रास यात समावेश असतो. किंवा एखाद्या ऑनलाईन फोटो एडिटिंग वेबसाईट किंवा व्हिडीओ एडिटिंग वेबसाईट्सवर जाण्यासाठी जेव्हा लॉग इन मागितलं जातं, त्यावेळी सहज म्हणून तुम्ही फेसबुकवरुन थेट लॉग इन करता, अशावेळी त्या वेबसाईट्स तुमच्या फेसबुकची माहिती अॅक्सेस करण्याची परवागनी मिळवतात. त्या वेबसाईट्स आणि अॅप्सची यादी या ‘अॅप्स अँड वेबसाईट्स’मध्ये इथे गोळा होते.

 

तुम्ही नियमित सेटिंगमध्ये येऊन, आपण कुठल्या कुठल्या अॅप्स आणि वेबसाईट्सना परवानगी दिलीय, ते पाहू शकता आणि त्यातील नको असलेले अॅप्स किंवा वेबसईट्स काढून टाकू शकता. तशी सुविधा फेसबुकने करुन दिली आहे.

यातील बरेच अॅप्स किंवा वेबसाईट्स आपण खूप दिवस न वापरल्याने एक्स्पायर्ड होतात, त्यांची यादी ‘अॅप्स अँड वेबसाईट्स’ यामध्ये एक्स्पायर्ड पर्यायात दिसते, तर जे अॅप्स किंवा वेबसाईट्स काढून टाकल्या आहेत, त्यांची यादी ‘रिमोव्ह्ड’मध्ये दिसते.

फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अॅप्स अँड वेबसाईट्स’ नियमित तपासत जा. कारण यामुळे तुम्ही ऑनलाईन जगतात सुरक्षितपणे वावरु शकता.