मायक्रोसॉफ्टच्या नवीन भारतीय प्रमुखाला भेटलात का? कोण आहे पवन दावुलुरी? किती आहे पगार

Pavan Davuluri : जागतिक ब्रँड आणि भारतीय असं जणू समीकरणच झाले आहे. आता मायक्रोसॉफ्ट विडोंचा कारभार पवन दावुलुरी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. दावुलुरी हो कोण आणि त्यांना किती पगार देण्यात आला आहे. त्यांनी कुठून शिक्षण पूर्ण केले असे अनेक कीवर्ड्स गुगलवर तेजीत आहेत...

मायक्रोसॉफ्टच्या नवीन भारतीय प्रमुखाला भेटलात का? कोण आहे पवन दावुलुरी? किती आहे पगार
मायक्रोसॉफ्टमध्ये या भारतीयाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 3:07 PM

पवन दावुलुरी (Pavan Davuluri) मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचे नेतृत्व करतील. पवन यांच्या खांद्यावर मायक्रोसॉफ्ट विंडोस सरफेसची (Microsoft Windows Surface) जबाबदारी असेल. आयआयटी मद्रास येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. या पदावर पूर्वी पनोस पानाय हे होते. आता त्यांच्या जागी पवन यांची वर्णी लागली आहे. पानाय यांनी गेल्यावर्षी मायक्रोसॉफ्टला टाटा बायबाय करत ॲमेझॉनची वाट चोखंदळली. मायक्रोसॉफ्टने यापूर्वीच विंडोज आणि सरफेस असे वर्गीकरण केलेले आहे. या दोघांचे नेतृत्व वेगवेगळ्य व्यक्तीकडे होते. पवन पूर्वी सरफेस Silicone चे काम पाहत होते.

कोण आहेत पवन दावुलुरी?

मीडिया वृत्तानुसार, पवन दावुलुरी यांनी आयआयटी मद्रास येथून पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मॅरीलँड विद्यापीठातून पदवी मिळवली आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ते रुजू झाले. ते गेल्या 23 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टशी जोडलेले आहेत. त्यांचे भारताशी खास नाते आहे. पवन आता नेतृत्व करणाऱ्या त्या समूहात सामील झाले आहेत. जिथे अगदी बोटावर मोजण्याइतके भारतीय आहेत, जे अमेरिकेन कंपन्यात नेतृत्व करत आहेत. यामध्ये सत्य नडेला आणि सुंदर पिचाई यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. पवन यांना मायक्रोसॉफ्ट विंडोचा कारभार सोपविल्यानंतर त्यांचा पगार किती हे काही समोर आलेले नाही.

हे सुद्धा वाचा

भारतीयाकडेच रिपोर्टिंग

या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्ट विडोंजचे पवन हे, मायक्रोसॉफ्टचे हेड आणि या विभागाचे प्रमुख राजशे झा यांच्याकडे त्यांचा कार्यपालन अहवाल सोपवतील. राजेश झा यांच्या एका पत्रामुळे या नियुक्तीचा आणि पवन यांच्याविषयीचा खुलासा समोर आला आहे. कंपनीने पवन दावुलुरी यांच्या नियुक्तीचा निर्णयाची माहिती या पत्रात देण्यात आली होती.

सत्य नडेला, क्लाऊड गुरु

सत्य नडेला यांना क्लाऊड गुरु म्हणून पण ओळखले जाते. मायक्रोसॉफ्टमध्ये क्लाऊड कम्युटिंगचे नेतृत्व त्यांनी केले. कंपनीला जगातील सर्वात मोठे क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमधील एक करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये बिझनेस डिव्हिजनमध्ये उपाध्यक्ष पदावर काम केले. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे डेटाबेस, विंडोज सर्व्हर आणि डेव्हलपर टूल्सला मायक्रोसॉफ्ट अज्योर क्लाऊड प्लॅटफॉर्मवर आणण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.