लॅपटॉप-कॉम्प्युटरच्या ड्राईव्हची सुरुवात C ने च का होते? A किंवा B ने का नाही?

| Updated on: Jan 09, 2022 | 12:00 PM

तुम्हाला एक प्रश्न पडलाय का? कॉम्प्युटर किवा लॅपटॉप मधील ड्राइव्हची सुरुवात C नेच का झाली आहे. या ड्राईव्हचे नाव A किंवा B असे का नाही ठेवले गेले? चला तर मग जाणून घ्या त्यामागे नेमके काय कारण आहे.

लॅपटॉप-कॉम्प्युटरच्या ड्राईव्हची सुरुवात C ने च का होते? A किंवा B ने का नाही?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी अनेकजण दैनंदिन जीवनामध्ये कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा वापर करत असतात, आता हल्लीची परिस्थिती अशी आहे की कॉम्प्युटर लॅपटॉप याच्याशिवाय आपले पानही हलत नाही. कॉम्प्युटर आणि लॅपटॉप आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. याचा वापर करत असताना कॉम्प्युटरच्या ड्राईव्हचाही आपण बऱ्याचदा वापर करतो. परंतु हा ड्राइव्ह C नावाने सेव्ह केलेला असतो. C ड्राइव्ह सोडून कॉम्प्युटर मध्ये दिले गेलेले वेगवेगळे प्रकारच्या ड्राइव्हचा वापर युजर आपल्या गरजेनुसार करत असतो परंतु कधी तुम्हाला एक प्रश्न पडलाय का? कॉम्प्युटर किवा लॅपटॉप मधील ड्राइव्हची सुरुवात C नेच का झाली आहे. या ड्राईव्हचे नाव A किंवा B असे का नाही ठेवले गेले? चला तर मग जाणून घ्या त्यामागे नेमके काय कारण आहे. (Why Windows Drive Letters Start With C Not A Or B)

ड्राईव्हला A किंवा B नाव न देण्यामागे खरे कारण आहे फ्लॉपी डिस्क. आधीच्या काळामध्ये कॉम्प्युटरमध्ये इंटरनल स्टोरेज अजिबात नव्हते. युजर कॉम्प्युटर मध्ये काहीच सेव्ह करू शकत नव्हते. कॉम्प्युटर मध्ये केले गेलेले काम सेव्ह करण्यासाठी आपल्याला फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह जोडावी लगायची, यालाच A ड्राईव्ह असे म्हटले जात असे.

वेळेनुसार स्टोरेज वाढवण्यासाठी दोन प्रकारची फ्लॉपी डिस्क तयार केली गेली. पहिली 5 1/4 इंचची आणि दुसरी 3 1/2 इंच इतकी होती. या दोन्ही फ्लॉपी डिस्क कॉम्प्युटर सोबत जोडले गेल्या आणि या डिस्क ला A आणि B ड्राईव्ह असे नाव दिले गेले. तेव्हापासूनच कॉम्प्युटर मध्ये दोन फ्लॉपी डिस्क ठेवण्यासाठीची आवश्यक जागा रिझर्व्ह ठेवण्यात येऊ लागली.

आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की फ्लॉपी म्हणजे नेमके काय असते? तसे पाहायला गेले तर फ्लॉपी डिस्क हा एक स्टोरेजचा प्रकार आहे. यामध्ये मॅग्नेटिक स्टोरेज स्वरूपामध्ये आपला डेटा स्टोअर केला जातो. या डिस्कला धूळ आणि स्क्रॅच पासून वाचवणे गरजेचे ठरते, अन्यथा ही डिस्क खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच या डिस्कला नेहमी एका सुरक्षित कव्हरमध्ये ठेवले जाते. बदलेल्या तंत्रज्ञान प्रगतीमुळे आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये झालेला बदल यामुळे अंदाजे दीड दशकापूर्वी फ्लॉपी डिस्क वापरणे बंद झालेले आहे.

फ्लॉपी डिस्क वापरण्याची सुरुवात 1960 मध्ये झाली होती. पहिली फ्लॉपी डिस्क 8 इंच इतकी होती त्यानंतर या डिस्कला अजून चांगले बनवले गेले आणि या डिस्कचा आकार पूर्वीपेक्षा कमी करण्यात आला, वेळेनुसार कॉम्प्युटर मध्ये स्टोरेज सिस्टम सुद्धा विकसित होऊ लागली आणि C ड्राइव्हला ऑपरेटिंग सिस्टम म्हणून तयार केले गेले. तसेच युजर आपल्या गरजेनुसार व आवश्यकतेनुसार वापर करू लागला परंतु C ड्राइव्ह ऑपरेटिंग सिस्टमसाठीच आज ही या ड्राइव्हचा वापर केला जातो.

इतर बातम्या

Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश

शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी

कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

(Why Windows Drive Letters Start With C Not A Or B)