AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 मध्ये शाओमीने एमआयएक्स 3 स्मार्टफोन लाँच केला. हा फोन लाँच केल्यानंतर शाओमी आता MIX 4 लाँच करणार आहे.

लवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 08, 2019 | 1:36 PM
Share

बीजिंग : मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 मध्ये शाओमीने एमआयएक्स 3 स्मार्टफोन लाँच केला. हा फोन लाँच केल्यानंतर शाओमी आता MIX 4 लाँच करणार आहे. या नव्या फोनमध्ये तब्बल 64 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे, असं शाओमीचे प्रोडक्ट डायरेक्टर वांग टेंग थॉमस म्हणाले.

एमआय MIX 4 मध्ये एक कॅमेरा असेल जो 64 मेगापिक्सल सॅमसंग जीडब्ल्यू 1 सेन्सरपेक्षा उत्कृष्ट असेल. नव्या फोनमध्ये 2 के एचडीआरचा 10 प्लस डिस्प्ले दिलेला आहे. तसेच डिव्हाईसमध्ये 115 अंकाचा डीएक्सओ मार्क स्कोअर असेल. अद्याप फोनच्या फीचरबद्दल माहिती मिळालेली नाही.

लिक झालेल्या माहितीनुसार, हा नवीन स्मार्टफोन पाणी आणि धूळीपासून बचाव करेल. यासाठी हा फोन आयपी 68 प्रमाणनचा सपोर्ट करेल. यापूर्वी रिअलमीनेही 64 मेगापिक्सलचा फोन लाँच करणार असल्याचे म्हटले होते. रिअलमीही या फोनवर काम करत आहे.

रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांनीही 64 मेगापिक्सल सॅमसंग जीडब्ल्यू 1 सेंसरचा एक फोटो ट्वीट केला होता. यामध्ये ते म्हटले होते की, कॅमेरा सेंसरला संघटीत करणारा सर्वात पहिला फोन भारतात लाँच होईल.

शाओमी आणि रिअलमी दोन्ही कंपन्या लवकरच 64 मेगापिक्सलचा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दोन्ही कंपनीमध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. दोन्ही कंपनीत कुणाचा फोन उत्कृष्ट ठरेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
संध्याकाळी 6 वाजता... पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर..
संध्याकाळी 6 वाजता... पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान