AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगची टेक्नोलॉजी वापरुन शाओमी सर्व कंपन्यांना मागे टाकणार

भारतात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याचे श्रेय पूर्णपणे MI कंपनीला दिले जाते. यानंतर आता सॅमसंगच्या टेक्नोलॉजीचा वापर करत  MI कंपनीद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. 

सॅमसंगची टेक्नोलॉजी वापरुन शाओमी सर्व कंपन्यांना मागे टाकणार
| Updated on: Jun 20, 2019 | 8:22 PM
Share

नवी दिल्ली : Xiaomi या चीनी कंपनीने नुकतंच Redmi Note 7 Pro या स्मार्टफोनद्वारे भारतात प्रथमच 48 मेगापिक्सलाचा कॅमेरा लाँच केला आहे. त्यामुळे भारतात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याचे श्रेय पूर्णपणे MI कंपनीला दिले जाते. यानंतर आता लवकरच  MI कंपनीद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात सॅमसंगच्या टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे.

XDA developer या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi ही कंपनी लवकरच भारतात 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. MI कंपनी Redmi K20 Pro या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचे दोन अल्ट्रा पिक्सल कॅमेरे लाँच करण्याची शक्यता आहे. याबाबतचे काही कोड्स काही डेव्हलपरला मिळाले आहेत.

दरम्यान Xiaomi या कंपनीने 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली  नाही. मात्र Redmi K20 Pro या फोनच्या लीक झालेल्या माहितीनुसार या फोनद्वारे 64 मेगापिक्सलचे दोन अल्ट्रा पिक्सल कॅमेरे असणार आहेत.

विशेष म्हणजे Xiaomi कंपनी 64 मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोनमध्ये सॅमसंग या कंपनीप्रमाणेच ब्राईट GW1 या कॅमेरा सेन्सर बसवण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ Xiaomi कंपनी समसंगच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत 64 मेगापिक्सलचा कॅमेरा भारतात लाँच करु शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आतापर्यंत फक्त समसंग या एकमेव कंपनीने 64 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर तयार केलं आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या समसंग Galaxy A70  स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र समसंगने या स्मार्टफोनमध्ये केवळ 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

संबंधित बातम्या : 

‘Redmi’ चे तीन स्मार्टफोन एकाचवेळी लाँच होणार!

Redmi चा पॉप अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन लवकरच बाजारात, किंमत तब्बल….

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.