Redmi चा पॉप अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन लवकरच बाजारात, किंमत तब्बल....

शाओमी कंपनीद्वारे Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजेच पहिल्यांदाचा MI च्या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi चा पॉप अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन लवकरच बाजारात, किंमत तब्बल....

मुंबई : भारतात MI या स्मार्टफोन कंपनीचे अनेक चाहते आहे. दिवसेंदिवस MI च्या स्मार्टफोनची क्रेझ वाढत असून, शाओमी कंपनीद्वारे Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. येत्या 15 जुलैला भारतात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

शाओमी इंडियाचे प्रकल्प निदेशक मनु कुमार जैन यांनी सोमवारी ट्विटद्वारे याबाबतचं ट्विट केलं आहे. “MI स्मार्टफोनच्या चाहत्यांना एक खुशखबर आहे. भारतात पुढील सहा महिन्यांमध्ये MI द्वारे Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन फोन लाँच करण्यात येणार आहे. माफ करा…पुढच्या सहा आठवड्यात”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याशिवाय “भारताला फ्लॅगशिप किलर 2.0 चा अनुभव घेण्याचा हीच खरी वेळ आहे”, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटंल आहे.

हे दोन्ही फोन लाँच होण्यापूर्वी काही जणांनी POCO F2 आणि POCO F2 Pro या स्मार्टफोनचे रिब्रँडिंग असतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र शाओमीद्वारे घोषणा करण्यात आलेले Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे पूर्णपणे नव्या रुपात येणार आहेत.

Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे फोन गेल्या आठवड्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. त्यानंतर पुढच्या सहा आठवड्यात म्हणजेच 15 जुलैपर्यंत भारतात हे फोन लाँच करण्यात येणार आहेत. Redmi K20 या फोनच्या 6GB+64GB व्हेरियंटची किंमत 1999 युआन म्हणजे 20 हजार रुपये आहे. तर 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 2099 युआन म्हणजेच 21 हजार रुपये आहे.

Redmi K20 आणि Redmi K20 Pro फोनची वैशिष्ट्य

या फोनचा डिस्प्ले 6.39 इंच AMOLED full-HD असणार आहे. या फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले असून प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल, सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सल, तर 8 मेगापिक्सलचा टेरिटेअरी कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजेच पहिल्यांदाचा MI च्या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याशिवाय या फोनची 4000 mAh बॅटरीची क्षमता आहे. या फोनमध्ये Android Pie हे अँड्रॉईड वर्जन देण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *