शाओमीचा भारतात स्पेशल ‘चश्मा’ लाँच, किंमत 899 रुपये, पाहा फीचर…

| Updated on: May 24, 2019 | 9:16 PM

मुंबई : शाओमीने भारतात नवीन ‘Mi Polarised Square’ चश्मा लाँच केला आहे. कंपनीने या चश्म्यांची किंमत 899 रुपये ठेवली आहे. Mi Polarised Square ची विक्री भारतात सुरु झालेली आहे. या चश्म्यामध्ये दोन रंग उपलब्ध आहेत. ब्लू आणि ग्रे रंगात हा चश्मा आहे. Mi Polarised Square चश्म्यात पोलराईज्ड लेन्स दिले आहेत आणि शाओमीने दावा केला आहे […]

शाओमीचा भारतात स्पेशल चश्मा लाँच, किंमत 899 रुपये, पाहा फीचर...
Follow us on

मुंबई : शाओमीने भारतात नवीन ‘Mi Polarised Square’ चश्मा लाँच केला आहे. कंपनीने या चश्म्यांची किंमत 899 रुपये ठेवली आहे. Mi Polarised Square ची विक्री भारतात सुरु झालेली आहे. या चश्म्यामध्ये दोन रंग उपलब्ध आहेत. ब्लू आणि ग्रे रंगात हा चश्मा आहे. Mi Polarised Square चश्म्यात पोलराईज्ड लेन्स दिले आहेत आणि शाओमीने दावा केला आहे की, यामधून यूजर्सला अप्रतिम व्हिज्युअल क्लॅरिटी दिसेल. Mi Polarised Square चश्म्यात अनेक फीचर दिलेले आहेत.

Mi Polarised Square ला TAC पोलराइज्ड लेन्ससोबत लाँच केले आहे. ही टेक्नोलॉजी ग्लेअर, पोलराईज्ड लाईट आणि हार्मफुल UV रेंजला डोळ्यांपर्यंत न पोहचण्यासाठी मदत करतात. हा चश्मा  पोलराईज्ड लेन्स कॉन्ट्रास्टला एन्हान्स करतो. व्हिज्युअल क्लॅरिटी वाढवतो आणि आय स्ट्रेनला रिड्युस करतो.

शाओमीने दावा केला आहे की, Mi Polarised Square चश्म्याला स्क्रॅच रेसिस्टेटही दिले आहे. चश्म्यामध्ये फ्लेक्सिबल टीआर 90 फ्रेम्स दिली आहे. हा चश्मा ड्युअरेबल, लाईटव्हेट आणि फ्लेक्सिबल आहे, अशी माहिती शाओमीने दिली आहे.

विशेष म्हणजे हा चश्मा यूनिसेक्स आहे. या चश्म्यासोबत ग्राहकांना 6 महिन्यांची वॉरंटी मिळणार आहे. इच्छुक ग्राहक हा चश्मा शाओमीच्या वेबसाईटवरुन खरेदी करु शकता.

शाओमीने आतापर्यंत मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बजारात विकल्या आहेत. आता कंपनीने जरा हटके असा चश्मा बाजारात लाँच केला आहे. हा चश्मा बाजारात किती चालतो हे मात्र काही दिवसांनतरच कळेल.