नव्या दमदार फीचर्ससह Xiaomi Mi Band 6 बाजारात, उरले फक्त काही तास

| Updated on: Aug 25, 2021 | 8:11 AM

हे फिटनेस बँड सर्वात आधी मार्चमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आलं होतं. त्या काळात Mi 11 सीरीजचे स्मार्टफोनही लाँच करण्यात आले. अशा परिस्थितीत भारतातील अनेक युजर्स या उत्पादनाची वाट पाहत आहेत.

नव्या दमदार फीचर्ससह Xiaomi Mi Band 6 बाजारात, उरले फक्त काही तास
Xiaomi Mi Band 6
Follow us on

मुंबई : Xiaomi ने पुष्टी केली आहे की, Mi Band 6 नेक्स्ट जनरेशन Mi Notebook सोबत लॉन्च केला जाईल. एमआय नोटबुक आणि एमआय बँड 6 दोन्ही डिव्हाईस 26 ऑगस्ट रोजी लॉन्च केले जातील. शाओमीने सोशल मीडिया पोस्टद्वारे या फिटनेस बँडची घोषणा केली आहे. शाओमीचे मुख्य व्यवसाय अधिकारी रघू रेड्डी यांनी इंडिया टुडेला सांगितले की, Mi Band 6 प्लॅनिंगनुसार लाँच केला जाईल. (Xiaomi Mi Band 6 will launch on 26th august in India, SpO2 sensor, BP Monitor)

फिटनेस बँड सर्वात आधी मार्चमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आलं होतं. त्या काळात Mi 11 सीरीजचे स्मार्टफोनही लाँच करण्यात आले. अशा परिस्थितीत भारतातील अनेक युजर्स या उत्पादनाची वाट पाहत आहेत. शाओमीने पुष्टी केली आहे की Mi Band 6 भारतीय वेरिएंट SPO2 सेन्सरसह येईल आणि त्यात 30 स्पोर्ट्स मोड असतील. तसेच यात AMOLED डिस्प्ले असेल. हे सर्व फीचर्स ग्लोबल वेरिएंटमध्ये देखील उपस्थित होते, त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. Mi Band 6 बद्दल अधिक वैशिष्ट्ये Mi Smarter Living 2022 मध्ये उघड होतील.

फीचर्स आणि स्पेक्स

Mi Band 6 मध्ये 1.56-इंचांचा AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 326ppi पिक्सल डेन्सिटी आणि 450 निट्स पीक ब्राइटनेस आहे. फिटनेस बँडमध्ये 30 स्पोर्ट्स मोड सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये वॉकिंग, रनिंग, इनडोर ट्रेडमिल आणि सायक्लिंगचा समावेश आहे. Mi Band 6 मध्ये स्लीप ट्रॅकिंगसह 24/7 ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन (SpO2) सेंसर आणि हार्ट-रेट मॉनिटरिंगची सुविधा आहे.

यात 125mAh ची बॅटरी असेल जी 14 दिवसांचा स्टँडबाय टाइम देईल, असा दावा केला जात आहे. बँड चार्ज करण्यासाठी दोन तास लागतात आणि ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा बँड 50 मीटर पर्यंत वाटरप्रूफ देखील आहे. एमआय बँड व्यतिरिक्त, शाओमी इतर कॅटेगरीजमध्ये देखील उत्पादने लॉन्च करेल, अशी अपेक्षा आहे. यामध्ये Mi नोटबुक व्यतिरिक्त नवीन Mi TV, नवीन राउटर आणि सिक्योरिटी कॅमेरा समाविष्ट असू शकतो.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स