व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू

| Updated on: Feb 11, 2021 | 6:26 PM

व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू (Xiaomi watch price low with rs 3000)

व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू
मी वॉच रिवॉल्व
Follow us on

नवी दिल्ली : प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आता तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट प्लान करीत असतो. व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर शाओमीने एका प्रोडक्टची किंमत कमी केली आहे. या प्रोडक्टचे नाव आहे मी वॉच रिवॉल्व (watch Revolve) असे आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने हे वॉच लाँच केले होते. लाँच केले तेव्हा या घड्याळाची किंमत 10,999 रुपये इतकी होती. आता कंपनीने या घड्याळाची किंमत 3 हजार रुपयांनी कमी करीत 7,999 रुपये इतकी केली असून ही ऑफर मर्यादीत कालावधीकरीता आहे. घड्याळाची किंमत तुम्ही अमेझॉन इंडिया आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. तुम्ही जर स्मार्ट वॉच युजर असाल आणि तुमचे घड्याळ अपग्रेड करु इच्छित असाल तर मी वॉच रिवॉल्व हा उत्तम पर्याय आहे. (Xiaomi watch price low with rs 3000)

मी वॉच रिवॉल्वची वैशिष्ट्ये

या घड्याळामध्ये 46 एमएम वॉच डायलसह 1.39 इंच राऊंड शेपचे एमोलेड टचस्क्रीन आहे. घड्याळाचा डिस्प्ले 454×454 पिक्सल रिझॉल्युशनचे आहे. स्क्रिनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. घड्याळाचा पट्ट्याची रुंदी 22 एमएम एवढी आहे. घड्याळात 10 स्पोर्ट्स मोड, मीडिया कंट्रोल, नोटिफिकेशन आणि 420mAh कॅपॅसिटीची बॅटरी आहे. त्याचबरोबर यात हार्ट रेट मॉनिटरिंग, जीपीएस, ब्लूटूथ, वॉटर रसिस्टेंस आदि फिचरही देण्यात आले आहेत.

गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय

तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट द्यायचे असेल तर हे घड्याळ उत्तम पर्याय आहे. हे घड्याळ म्हणजे अनेक फिचर उपलब्ध असलेले हे एक उत्तम फिटनेस बँड आहे. याशिवाय तुम्ही या घड्याळात अनेक कस्टमायझेशन करु शकता. हे घड्याळ एकदा चार्ज केल्यास 15 दिवस बॅटरी बॅकअप देते. (Xiaomi watch price low with rs 3000)

 

 

इतर बातम्या

इन्स्टाग्राममध्ये होणार मोठे बदल, ट्विटरवरील कारवाईनंतर इन्स्टाग्राम सावध

बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान, केवळ 199 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा