बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान, केवळ 199 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान, केवळ 199 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा (Unlimited calling and data from BSNL for customers at Rs 199)

  • Updated On - 1:04 pm, Thu, 11 February 21
बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान, केवळ 199 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
केवळ 199 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आणला आहे. कंपनीने नुकतेच आपल्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लान वाऊचरमध्ये सुधारणा केली आहे. या प्लानसोबत आता अनलिमिटेड ऑफ नेट आणि ऑन नेट व्हाईस कॉलची सुविधाही देण्यात येणार आहे. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओला टक्कर देत आहे. (Unlimited calling and data from BSNL for customers at Rs 199)

कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग

बीएसएनएलचे अनलिमिटेड कॉलिंग केवळ बीएसएनएल नंबरसाठीच नाही तर कोणत्याही अन्य नेटवर्कच्या नंबरवर, लँडलाईन नंबरवर फ्री कॉल करु शकता. या प्लानमध्ये युजर्सला 25 जीबी डेटा मिळतो. यासोबतच कंपनी डेटा रोलओवरचा सुविधा देते. यामुळे युजर्स 75 जीबीपर्यंत डेटा रोलओवर करु शकतात. बीएसएनएलने 199 रुपयाच्या प्लानमध्ये केलेले हे नवे बदल 1 फेब्रुवारीपासून लागू होतील. नविन प्लानबाबत बीएसएनएलने ट्विट करुन माहिती दिली आहे. याआधी डिसेंबरमध्येही बीएसएनएलने 199 रुपयाच्या प्लानमध्ये सुधारणा केली होती. आधी या प्लानमध्ये केवळ 300 मिनिटे व्हाईस कॉलची सुविधा होती. नंतर कंपनीने ही कॉल मर्यादा अनलिमिटेड केली.
यासोबतच या प्लानसोबत रोज 100 एसएमएसची ऑफरही देण्यात आली आहे.

बीएसएनएलचे 199 रुपयात प्रीपेड प्लान

पोस्टपेड प्लान व्यतिरिक्त याच रेंजमध्ये कंपनी प्रीपेड प्लानही देत आहे. या 199 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला दर दिवशी 2 जीबी हाय स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. या प्लानची 30 दिवसाची व्हॅलिडीटी असेल. या प्लानद्वारे युजर्सला एकूण 60 जीबी डेटा देण्यात येत आहे. रिचार्ज आणि व्हॅलिडीटीमध्ये बीएसएनएलचे रिचार्ज प्लान जिओ आणि एअरटेलपेक्षा अधिक चांगले आहे. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडियाला टक्कर देत आहे. दोन्ही कंपन्यांनी याआधीच आपल्या ग्राहकांसाठी 199 रुपयाचा प्रीपेड प्लान आणला आहे. (Unlimited calling and data from BSNL for customers at Rs 199)

 

 

इतर बातम्या

मास्टरकार्डच्या नेटवर्कवरून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याची संधी

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ बँकेतून 6 महिन्यांसाठी पैसे काढता येणार नाहीत; RBI चे निर्बंध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI