माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा, भारतीय कायद्यांचे पालन करा अन्यथा…

माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा, भारतीय कायद्यांचे पालन करा अन्यथा... (Information Technology Minister warns social media companies)

माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा, भारतीय कायद्यांचे पालन करा अन्यथा...
रवी शंकर प्रसाद यांचा सोशल मीडियाला इशारा
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 3:04 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भडकाऊ पोस्ट केल्याप्रकरणी 500 अकाऊंट्स कारवाई केल्यानंतर आता केंद्रीय संचार, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्व सोशल मीडिया कंपन्यांना धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर खोट्या बातम्या किंवा भडकाऊ विषयांवरील पोस्ट शेअर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत बोलताना दिला. ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल प्लॅटफॉर्मला देशातील व्यापारादरम्यान भारतीय नियमांचे पालन करण्यास सांगितले. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे, मात्र आर्टिकल 19ए नुसार याला काही बंधनेही असल्याचे त्यांनी नमूद केले. (Information Technology Minister warns social media companies)

सोशल मीडियाबाबत सन्मान मात्र दुरुपयोग नको

आम्ही सोशल मीडियाचा सन्मान करतो. सोशल मीडियामुळे सामान्य लोकांना सशक्त बनवले आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमात सोशल मीडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे. मात्र खोट्या बातम्या आणि हिंसा पसरवण्यासाठी भारतात सोशल मीडियाचा दुरुपयोग केला गेला तर कडक कारवाई केली जाईल, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भारतीय संविधानाचे पालन करावे लागेल. भारतीय संविधान टीका करण्यास परवानगी देते, मात्र खोटी बातमी देण्यास अनुमती देत नाही. आम्ही ट्विटर आणि सोशल मीडियाच्या काही बाबींचे निरीक्षण केले. जर त्यांना भारतात व्यापार करायचा असेल तर भारतीय कायद्यांचे पालनही करावे लागेल. वेगवेगळ्या देशांसाठी भिन्न निकषांना परवानगी दिली जाऊ शकत नाही. कॅपिटल हिलवरील घटना आणि लाल किल्ल्यावरील घटनांना वेगळे निकष असू शकत नाहीत.

देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत हिंसा भडकवणाऱ्या पोस्ट ट्विटरवर टाकणाऱ्या ट्विट्स न हटवल्याने भारत सरकारने बुधवारी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली होती. वादग्रस्त पोस्ट टाकणारी अकाऊंट्स बंद करण्याचे आदेश भारत सरकारने ट्विटरला दिले होते. याप्रकरणी संचार, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी ट्विटरच्या अधिकाऱ्यांसोबत एक व्हर्च्युअल मिटिंगमध्ये चर्चा केली. (Information Technology Minister warns social media companies)

इतर बातम्या

मोदी सरकारचा हा लेफ्ट टर्न, राईट टर्न आहे की यु-टर्न?, पवारांवरील मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

केंद्राकडून पुण्याच्या ‘मेट्रो 2’ प्रकल्पाला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.