केंद्राकडून पुण्याच्या ‘मेट्रो 2’ प्रकल्पाला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला (Devendra Fadnavis on Pune Metro 2 project).

केंद्राकडून पुण्याच्या 'मेट्रो 2' प्रकल्पाला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 2:58 PM

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील विकास कामांच्या विविध प्रोजेक्टबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पुण्यातील मेट्रो 2 प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. केंद्राच्या पुढच्या अर्थसंकल्पात मेट्रो 2 प्रकल्पासाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करु, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले (Devendra Fadnavis on Pune Metro 2 project).

“पुणे मेट्रो संदर्भात 22 किलोमीटरचा पहिला टप्पा यावर्षीच सुरु करण्यात येईल. उर्वरीत 10 किमीचा मार्ग 2022 मध्ये सुरु करण्यात येईल. मेट्रोचा दुसरा टप्पा हा 60 किमीचा आहे. या प्रकल्पाबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला दिली तर आम्ही पाठपुरावा करुन पुढच्या बजेटमध्ये त्याचा निधी मिळेल असा प्रयत्न करु. पुणे मेट्रो 2 साठी निधी मिळावी, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून पुणेकरांना दिलं.

“महापौरांनी मला आढावा घेण्यासाठी निमंत्रित केलं होतं. मी मुख्यमंत्री असताना विविध योजना मंजूर केल्यात. 24 / 7 पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती”, असं फडणवीस यांनी सांगितलं (Devendra Fadnavis on Pune Metro 2 project).

“पुणे महापालिकेने रिव्हर फंड डेव्हलोपमेंटचा अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. आपल्याकडे अतिशय सुंदर नदीपात्र आहे. त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर आराखडा महापालिकेने तयार केला आहे. महापालिकेने सरकारकडे एसपीव्हीची परवानगी मागितली आहे. ती परवानगी अजून मिळाली नाही. मात्र, मी देखील सरकारला यासाठी विनंती करेन. मे पर्यंत या रिव्हर प्लांट डेव्हलोपमेंटचं काम सुरु झालं पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन महापालिकेने केलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“एक अत्यंत महत्त्वकांशी प्रोजेक्ट जो पुण्याला पर्यावरण पुरक शरह करणार आहे. शंभर टक्के सिव्हेज ट्रिटमेंट, ज्यादृष्टीने मुळा-मुठाचा जायका प्रोजेक्ट संकल्पित करण्यात आला. जपानच्या जायकाने या प्रोजेक्टसाठी शंभर टक्के फंडींग दिले आहेत. यामध्ये 11 एसटी तयार करायचे आहे. यातील जे सांडपाणी नदीपात्रात जातं ते पूर्णपणे ट्रिट होईल. पुणे हे पहिलं शहर होईल, जे शंभर टक्के सिव्हेजला ट्रिट करणार आहे. या प्रोजेक्ट संदर्भात मागच्या काळात निविदा काढल्या होत्या. मात्र, त्या निविदा खूप चढ्या दराने आल्याने रद्द झाल्या”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

“केंद्र सरकारने नमोमी गंगेच्या नावावर अशा प्रकारच्या नदीच्या पुनर्जिवणासाठी नॉर्म्स तयार केले आहेत. त्यामध्ये 15 वर्षांचे मेंटेनन्स कम्पशन केलं आहे. त्यामुळे फेब्रुवारीत टेंडर काढून जूनपर्यंत काम सुरु होईल”, असं फडणवीस म्हणाले

“मी मुख्यमंत्री असताना घनकचराच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घेतला होता. मागच्या काळात पुण्याला निधी दिला होता. कचऱ्यापासून विजद्यूत निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता. तीन महिन्यात साडेसहाशे पैकी 300 टन कचऱ्याची विद्यूत निर्मिती तयार होईल. एकूण 1300 टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचे प्रोजेक्ट सुरु होतील”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

“प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत सहा हजार घरांचा प्रोजेक्ट सुरु आहे. याशिवाय 19 हजार घरांचा प्रोजेक्ट घेण्यात आला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर डिसेंबरपर्यंत पुण्यात 500 बसेस वाढणार, असंदेखील त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : पंचगंगा स्वच्छ करा आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; स्वाभिमानीचे हटके आंदोलन

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.