इन्स्टाग्राममध्ये होणार मोठे बदल, ट्विटरवरील कारवाईनंतर इन्स्टाग्राम सावध

इन्स्टाग्राममध्ये होणार मोठे बदल, ट्विटरवरील कारवाईनंतर इन्स्टाग्राम सावध (instagram aware after strict action on twitter)

इन्स्टाग्राममध्ये होणार मोठे बदल, ट्विटरवरील कारवाईनंतर इन्स्टाग्राम सावध
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 4:27 PM

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी ट्विटरबाबत भारत सरकारने घेतलेली कडक भूमिका पाहता फेसुबकचे मॅसेजिंग अॅप असेलेले इन्स्टाग्राम जागरुक झाले आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कंपनी ते अकाऊंट बंद करेल, अशी घोषणा कंपनीने केली आहे. कुणालाही परस्पर मॅसेज पाठवणे हे नियमांचे उल्लंघन समजले जाते. अशा व्यक्तींना कंपनी काही काळासाठी निलंबित करते. त्या ठराविक कालावधीमध्ये सदर व्यक्ती कोणतेही मॅसेज पाठवू शकत नाही. (instagram aware after strict action on twitter)

वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास अकाऊंट डिसेबल

एखाद्या व्यक्तीने वारंवार नियम मोडले तर त्या व्यक्तीचे अकाऊंट डिसेबल करण्यात येईल, असे इन्स्टाग्रामने स्पष्ट केले. मॅसेजिंगबाबत कंपनीचे नियमांपासून मुक्त होण्यासाठी तयार केलेली नवीन खातीही आम्ही डिसेबल करु. आम्ही इन्स्टाग्रामवर होत असेलेल्या मॅसेजिंगवर लक्ष ठेवून आहोत. जे अकाऊंट्स आक्षेपार्ह मॅसेज टाकण्यासाठी बनविण्यात आलेत असे निदर्शनास येईल ते अकाऊंट्स कंपनीकडून डिसेबल करण्यात येतील. अनेक देशांमध्ये पर्सनल अकाऊंट्सवर कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामकडून पुढे सांगण्यात आले की, अज्ञात व्यक्तीचे मेंशन आणि टॅग टाळायचे असल्यास तुम्ही टर्न ऑफचे ऑप्शन सिलेक्ट करु शकता. तसेच अनैच्छिक मॅसेज टाळण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉकही करु शकता.

माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा सोशल मीडियाला इशारा

केंद्रीय संचार, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्व सोशल मीडिया कंपन्यांना धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर खोट्या बातम्या किंवा भडकाऊ विषयांवरील पोस्ट शेअर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत बोलताना दिला आहे. ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल प्लॅटफॉर्मला देशातील व्यापारादरम्यान भारतीय नियमांचे पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले. रवी शंकर प्रसाद यांच्या भूमिकेनंतर इन्स्टाग्रामने सावध भूमिका घेत काही बदल केले आहेत. (instagram aware after strict action on twitter)

इतर बातम्या

माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा, भारतीय कायद्यांचे पालन करा अन्यथा…

आता AC थ्री टियर कोचमध्ये मिळणार कन्फर्म तिकीट, करा आरामदायी प्रवास!

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.