तुमच्या फोनचा कॅमेरा फोटो काढण्यापेक्षाही बरेच काही करू शकतो, ‘या’ गोष्टी जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

आजकाल फोन कॅमेरे फक्त फोटोग्राफीसाठी नाहीत. ते अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकतात, जसे की कागदपत्र स्कॅनिंग, आणि एआय आल्याने कॅमेऱ्यांचा वापर आणखी वाढला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की आपल्या फोनचा कॅमेऱ्याचा वापर आणखीन कोणत्या गोष्टींसाठी करता येतो.

तुमच्या फोनचा कॅमेरा फोटो काढण्यापेक्षाही बरेच काही करू शकतो, या गोष्टी जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य
mobile camera
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jan 01, 2026 | 11:22 AM

आजच्या डिजिटल युगात असे अनेक स्मार्टफोन आहेत जे खास करून कॅमेऱ्याच्या क्वॉलिटीसाठी ओळखले जातात. तसेच ज्यांना फोटोग्राफी करण्याची आवड आहे ते अशाच योग्यतेचा फोन शोधतात ज्याचा कॅमेरा क्वॉलिटी उत्तम आहे. तर फोनच्या कॅमेऱ्याचा मुख्य वापर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी केला जातो. तुम्ही कॅमेरा ॲप वापरत असलात किंवा स्नॅपचॅट सारखे दुसरे ॲप वापरत असलात तरी कॅमेरा मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी वापरला जातो. काही लोकांना कदाचित हे लक्षात आले असेल की फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करणे हे कॅमेऱ्याचे एकमेव काम नाहीये. तर आजकाल तुम्ही फक्त फोटो काढण्यापेक्षा अनेक इतर कारणांसाठी कॅमेरा वापरू शकता, ज्यामध्ये कागदपत्रे स्कॅन करणे आणि इतर अनेक कामे समाविष्ट आहेत. चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कॅमेऱ्याचा वापर कोणत्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो.

एआय चॅटबॉटशी गप्पा मारणे

चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी सारखे एआय चॅटबॉट्स आता लाईव्ह कॅमेरा शेअरिंगला सपोर्ट करतात. वापरकर्ते त्यांच्या कॅमेरा फीडचा वापर करून एआय चॅटबॉटला व्हिज्युअल कॉन्टेक्स्ट देऊ शकतात, ज्यामुळे ते चांगले प्रतिसाद देऊ शकते. जसे की जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट ड्रेसमध्ये रस असेल, तर तुम्ही तुमचा कॅमेरा चालू करू शकता आणि एआय चॅटबॉटकडून सजेशन मिळवू शकता.

ट्रान्सलेशन

तुमच्या फोन मधला कॅमेऱ्याचा वापर एखादा मजकूर ट्रान्सलेशनसाठी देखील केला जाऊ शकतो. तुम्ही जर अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला एखादी भाषा येत नसेल किंवा समजत नसेल तर हे फिचर खूप उपयुक्त आहे. तुम्ही कॅमेरा वापरून दुसऱ्या भाषेत लिहिलेले मजकूर मेनू आणि इतर कागदपत्रे सहजपणे ट्रान्सलेट करू शकता आणि समजू शकता.

Google Lens वापरून शोधा

तुम्हाला जर एखादी वस्तू ओळखायची असेल किंवा तुम्हाला आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन शोधायची असेल, तर गुगल लेन्स उघडा आणि कॅमेऱ्याद्वारे ती वस्तू दाखवा. यामुळे त्या वस्तूबद्दल ऑनलाइन उपलब्ध असलेली सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रिनवर दिसेल. यामुळे केवळ त्या वस्तूबद्दल माहितीच मिळणार नाही, तर उपलब्ध असल्यास खरेदी लिंक्स देखील मिळतील.

कागदपत्र स्कॅनिंग

आजकाल कॅमेऱ्यांचा वापर करताना कागदपत्रे स्कॅन करणे हा एक आवश्यक भाग बनला आहे. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी मोठ्या स्कॅनरची आवश्यकता असण्याचे दिवस गेले आहेत. आता फक्त कागदपत्र कॅमेऱ्यासमोर ठेवा, आणि ते काही सेकंदात स्कॅन होईल. तुम्ही विविध अॅप्स वापरून कागदपत्रे एडिट देखील करू शकता.