AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple फोनसाठी इतकं कुणी उतावीळ असतं का? iPhone 15 घेण्यासाठी तो थेट गुजरातहून मुंबईत; 17 तास रांगेत थांबला अखेर…

कुणाला कशाची क्रेझ वाटेल याची काही शाश्वती नाही. एखादी गोष्ट मनात भरली तर ती मिळवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. अगदी ती गोष्ट मिळवण्यासाठी तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकतो. एका तरुणाच्याबाबतीतही असाच किस्सा घडलाय.

Apple फोनसाठी इतकं कुणी उतावीळ असतं का? iPhone 15 घेण्यासाठी तो थेट गुजरातहून मुंबईत; 17 तास रांगेत थांबला अखेर...
Ahmedabad manImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2023 | 7:37 AM
Share

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : कुणाला कशाची क्रेझ असेल काहीच सांगता येत नाही. एखादी गोष्ट मनात बसली की ती मिळवण्यासाठी माणूस जंग जंग पछाडत असतो. मग तो दिवस रात्र, काळवेळ, राज्य देश अहो एवढंच काय तो देशाच्या सीमाही पाहात नाही. ती गोष्ट मिळवण्यासाठी देशाच्या सीमा ओलांडून जाणारेही वेडे बक्कळ आहेत. अशाच एका मोबाईल वेड्याचा किस्सा समोर आला आहे. आयफोन 15 लॉन्च होताच तो खरेदी करण्यासाठी एक पठ्ठ्या थेट गुजरातहून मुंबईत आला. 17 तास रांगेतही थांबला अन् अखेर त्याच्या हाती… काय झालं त्या मोबाईल वेड्याचं?

अॅपलने 13 सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरीज लॉन्च केली होती. भारतात शुक्रवारी 22 सप्टेंबरपासून आयफोन 15ची विक्री सुरू झाली. अॅपलच्या आयफोन 15 सीरीजची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत अॅपल स्टोरमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अॅपलच्या आयफोन 15चं वेड इतकं आहे की एक तरुण हा फोन खरेदी करण्यासाठी थेट गुजरातच्या अहमदाबादहून मुंबईत अॅपल स्टोरमध्ये आला. हा फोन खरेदी करण्यासाठी त्याने दोन तीन नव्हे तर तब्बल 17 तास रांगेत घालवले.

थेट विमानाने मुंबईत

हा फोन खरेदी करण्यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अॅपल स्टोरमध्ये मेड इन इंडियाचा पहिला फोन खरेदी करण्यासाठी अहमदाबादहून आलो आहे, असं त्याने सांगितलं. एवढंच नव्हे iphone15 Pro Max खरेदी करण्यासाठी तो अहमदाबादहून विमानाने मुंबईत आला होता. बीकेसीत तो गुरुवारी दुपारी 3 वाजता आला. तो फोन घेण्यासाठी 17 तास रांगेत उभा होता. मी Apple Watch Ultra 2 आणि नव्या Apple AirPods सह व्हाइट टायटेनियममध्ये एक iphone15 Pro Max बुक केला आहे. हा ब्रँड सर्वात चांगला आहे, असं त्याचं म्हणणं आहे.

किंमत किती?

अमेरिकेत आयफोन 15 ची किंमत 799 डॉलर आणि आयफोन 15 प्लसची किंमत 899 डॉलर आहे. तर iPhone 15 Pro ची किंमत 999 डॉलर आणि iPhone 15 Pro max ची किंमत 1199 डॉलर ठेवलेली आहे. भारतात याची सुरुवात 79, 999 रुपयांपासून आहे. ही किंमत आयफोन 15 सीरीजच्या बेस 128 जीबी मॉडलची आहे.

iPhone 15 सीरीजचे स्पेसिफिकेशन

-डिस्प्ले 6.10 इंच

-प्रोसेसर अॅपल A16 बायोनिक

-फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सल

-रियर कॅमेरा 48 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल

-रॅम 8 जीबी

-स्टोरेज 128 जीबी

-ओएस आयओएस 17

-रिझॉल्यूशन 1179×2556 पिक्सल

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना