पंकजा मुंडेंनी संगणक परिचालकांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं!

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, बीड : संगणक परिचालकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. टीव्ही 9 मराठी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणं टाळलं. वेळेवर पगार द्यावा आणि आयटी महामंडळ नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. यासाठी 27 तारखेला संगणक परिचालक संघटनेकडून मुंबईत […]

पंकजा मुंडेंनी संगणक परिचालकांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं!
Follow us
| Updated on: Nov 13, 2018 | 10:15 AM

सागर आव्हाड, टीव्ही 9 मराठी, बीड : संगणक परिचालकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. टीव्ही 9 मराठी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र उत्तर देणं टाळलं. वेळेवर पगार द्यावा आणि आयटी महामंडळ नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. यासाठी 27 तारखेला संगणक परिचालक संघटनेकडून मुंबईत आंदोलनही करण्यात येणार आहे.

बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळ पाहणी दौरा होता. यावेळी बीडच्या पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही सोबत होत्या. पंकजा मुंडे यांना टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने संगणक परिचालकांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं समजलं नाही.

काय आहे संगणक परिचालकांचा प्रश्न?

पूर्वीचा संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) हा प्रकल्प एप्रिल 2011 ते डिसेंबर 2015 पर्यंत शासनाच्या माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून चालवण्यात आला. या वेळी राज्यातील 27906 ग्रामपंचायती साठी 22500, 351 पंचायत समिती स्तरावर 702 आणि 34 जिल्हा परिषदेमध्ये 170 असे एकूण 23372 संगणक परिचालक नियुक्त करण्यात आले होते.

महाऑनलाईन कंपनी जिल्हा परिषदेकडून प्रती संगणक परिचालक 8000 मानधन घेत होती. पण संगणक परिचालकांना मात्र 50 रु, 200 रुपये, 1200, 1700, 3500 असं मानधन देऊन उर्वरित निधी हडप करण्याचं काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केलाय.

याबाबत राज्यातील संगणक परिचालकांनी एकत्र येऊन राज्यभरात कंपनीच्या विरोधात आंदोलन, मोर्चे सुरू झाले. राज्य संघटनेच्या वतीने महाऑनलाईन कंपनीवर कारवाई करून संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत समाऊन घेणे ही मागणी ठेवण्यात आली.

संबंधित बातमी :

डिजीटल महाराष्ट्रचा कणा असलेल्या संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.