धक्कादायक, १० वीचा पहिला पेपर आणि परिक्षा केंद्राची रिल्स Instagram व्हायरल

दहावीची परीक्षा म्हणजे बोर्डाची परीक्षा म्हटली जाते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्याला पुढे काय करायचे आहे याचा निर्णय घेण्यास निर्णायक परीक्षा असते. अशा आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेचा यंदा दहावीचा पहिला पेपर उद्या सोमवारी आहे.

धक्कादायक, १० वीचा  पहिला पेपर आणि परिक्षा केंद्राची रिल्स Instagram  व्हायरल
ssc marathi परिक्षा केंद्राची रिल्स Instagram व्हायरल
| Updated on: Feb 23, 2025 | 6:53 PM

दहावीचे वर्षे आयुष्यात सर्वात महत्वाचे असते. विद्यार्थी दहावीच्या वर्षांला खूप महत्व देतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ही परीक्षा असते. परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी विविध यंत्रणा उपाय योजना करीत असतात. परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्याना मोबाईल, कॅल्युलेटर्स आणि कॅमेरे नेण्यास सक्त मनाई असते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा विविध उपाय योजना करीत असतात. कडेकोट पहारा देण्यासाठी आणि दहावीची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असते. यंदा पेपर फुटी कॉपी सारखे प्रकार होऊ नये यासाठी सर्व बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. उद्या दहावीचा भाषा विषय मराठीचा पहिला पेपर आहे. असे असताना एक यंत्रणेत गफलत झाली आहे ?

राज्यात दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी विविध यंत्रणांनी व्यापक उपाय योजना केली आहे. तरीही परीक्षा केंद्र परिसरात आणि परीक्षा देत असलेल्या वर्गातून व्हिडिओ काढून चक्क इंस्टाग्राम वर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्र आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कलम 163 लागू केल्यानंतरही या विद्यार्थ्याने त्याचा मोबाईल आतमध्ये नेला कसा? असा सवाल केला आहे. एवढा बंदोबस्त असताना देखील या युजरने व्हिडिओ काढलाच कसा ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. हा सर्व प्रकार आहे अकोला शहरातल्या अग्रेसर चौकातील सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या सेंटरवर दहावीची परीक्षा सुरू असताना घडला आहे.

येथे पाहा ती पोस्ट –

या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट

दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. पहिला पेपर आणि पहिल्याच पेपरच्या दिवशी एका विद्यार्थ्याने चक्क परिसरामध्ये मोबाईल नेऊन संवदेन परिसराचा व्हिडीओ शूट केला कसा ? असा सवाल केला जात आहे. हा विद्यार्थी तेवढ्यावरच थांबला नाही. दहावीच्या परीक्षा सुरू असलेल्या वर्गातही मोबाईल घेऊन गेला आणि परीक्षा सुरू असतानाचा व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये शूट केला.आणि तो व्हिडिओ चक्क त्याने त्याच्या sameer_vlogs_253 या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट  केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास मनाई केली आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल आदी वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. या विद्यार्थ्यांने मोबाईल आतमध्ये नेलाच कसा आणि त्याला शूट करताना कोणी पाहिले कसे नाही ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.