
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओ ओरिजनल आहेत तर काही व्हिडीओ एआय निर्मित आहेत. गंमत म्हणून बनवलेले काही व्हिडीओ तर इतके रिअल वाटतात की काही क्षण हा व्हिडीओ खोटा असेल असं वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या 19 मिनिट 34 सेकंदाचा हा एमएमएस व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा माहीत नाही. याबाबतची कुणीही पुष्टी केलेली नाही. टीव्ही9 मराठी सुद्धा या व्हिडीओची पुष्टी करत नाही. पण या व्हिडीओबाबत सोशल मीडियात अनेक दावे केले जात आहेत. काय आहे या व्हिडीओचं सत्य? त्याचाच घेतलेला हा आढावा.
काय दावा केला जातोय?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका तरुणासोबत एका तरुणीचा आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाला होता. 19 मिनिट 34 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओतील तरुण आणि तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी येऊन धडकली होती. पण त्याची पुष्टी झाली नाही. आता नवीन बातमी समोर आली आहे. नव्या माहितीनुसार या तरुणीनेच जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओतून तसं दिसत आहे. पण याबाबतची सत्यता अजून पटलेली नाही. त्यामुळे या मुलीचं नक्की काय झालं? असा सवाल केला जात आहे.
व्हिडीओत काय दिसलं?
हा नवा व्हिडीओ काळीज थरथर कापवणारा आहे. या कथित व्हायरल व्हिडीओत तरुणीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसत आहे. पोलिस घटनास्थळी जाऊन तपास करत आहे. या व्हिडीओवर एक कॅप्शन लिहिलेली आहे. 19 मिनिट 34 सेकंदाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीने आपलं आयुष्य संपवलं, असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. पण तथ्यांची तपासणी केली असता हा दावा खोटा असल्याचं उघड झालं आहे. ज्या महिलेच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तिचा एमएमएसमधील महिलेशी काहीच संबंध नाहीये. दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्याचं सांगितलं जात आहे.
प्रकरण काय आहे?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक 19 मिनिट 34 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक तरुण तरुणीनी आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात कसा आला हे अद्याप समजलेलं नाही. नेमकं कशासाठी हा व्हिडीओ व्हायरल झाला हेही समजलेलं नाहीये. याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.