
अवघ्या दोन हजाराच वस्तीचे हे गाव. पाच-सहा गल्ल्या, मोठे दोन-तीन चौक, मंदिर, पार, पंचायत आणि आजुबाजूला शेतवस्ती. इतर गावांप्रमाणेच येथील दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण गेल्या दीड महिन्यात या गावातील वातावरण बदलले आहे. या दीड महिन्यात येथील 24 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. जणू पंचकच लागले म्हणा ना. पण हे पचंक काही पूर्ण झालेले नाही. एका मागून एक गावकरी स्वर्गवासी होत असल्याने महिला आणि पुरुष दहशतीखाली आले आहेत. आता तर गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील एका साधु पुरुषाचे पाय धरले आहेत. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी गावातील जागेश्वर मंदिरात गावकरी संकट टळण्यासाठी मंत्रोपच्चार आणि पूजा करणार आहेत.
उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ सुल्तनापूर नावाचे गाव आहे. येथे महिला, पुरुषच नाही तर तरुणांचा आकस्मिक मृत्यू होत असल्याने गावकरी दहशतीखाली आले आहेत. तीन दिवसांपूर्वीच गावातील सीलू यांचा मृत्यू झाला. ही बाब समजल्यावर बाहेर गावी असलेले कल्लू आणि श्याम सिंह हे गावाकडे निघाले. पण रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मग गावात एकाच दिवसी तीन अंतयात्रा निघाल्या. त्यापू्र्वी अवघ्या महिनाभरात 21 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सातत्याने अशाच घटना घडत असल्याने गावकऱ्यांना घाम फुटला आहे.
गावात एक आठवड्यापूर्वी माळदाच्या घरावरून पडून सरमन यांचा मृत्यू ओढावला. तर गावातीलच अनिल, गौरव आणि अंकित हे तिघे असेच आकस्मिक गेले. सातत्याने अशा घटना घडत आहेत. कोणी विहिरीत पडून तर कुणाच्या अंगावर झाड पडून, कोणी रस्ते अपघातात. तर कुणावर वीज पडून, मयतांचा हा आकडा आता 24 वर गेला आहे. गावकरी या घटनांमुळे भयभीत झाले आहे. या गावावर मृत्यूची छाया पडल्याच्या भीतीने गावकरी घामाघूम झाले आहेत. उद्या कुणाचा नंबर असेल याचीच चिंता त्यांना सतावत आहे.
पंचक्रोशीत पिरोना आश्रम आहे. तिथे एक साधू राहतात. गावकऱ्यांनी मग त्यांच्याकडे धाव घेतली. गावा शेजारील सर्वात जुन्या जागेश्वर मंदिरात त्यांनी पूजा केली. श्रावणातील पहिल्या सोमवारी पुन्हा पूजा करण्यासाठी गावकरी जातील. पिरोना आश्रमातील साधुंनी गावकऱ्यांना कन्या भोज करण्याचा सल्ला दिला आहे. तर राम नाम आणि ऊँ नमःशिवाय जप करण्यास सांगितले आहे. बाबाजी लवकरच या गावात येणार आहेत.