Swami Chaitanyananda: बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवतेस का, मग कंडोम…? स्वामीजींनी मुलींना विचारलेले 10 अश्लील प्रश्न ऐकून सर्वजण हादरले
Swami Chaitanyananda: विद्यार्थिनींशी छेडछाड करणारा हा बाबा त्यांना असे प्रश्न विचारायचा की त्याचे प्रश्न ऐकून मुली घाबरून जायच्या. आता हे प्रश्न नेमके काय होते? याचा खुलासा झाला आहे. ते ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी… हे नाव ऐकताच दिल्लीतील मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थिनी अजूनही थरथर कापतात. ‘घाणेरडे कृत्य’ करणाऱ्या या बाबाविरुद्ध आतापर्यंत 32 मुलींनी तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी 17 जणींनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता धक्कादायक माहिता लोकांसमोर येत आहे. या स्वामी चैतन्यानंद बाबाने मुलींच्या रुममध्ये हिडन कॅमेरे लावले होते. तसेच तो विद्यार्थीनींना मध्यरात्री त्याच्या खोलीत बोलवत असते. त्यावेळी त्यांना तो कोणते प्रश्न विचारत असे याचा खुलासा झाला आहे. हे प्रश्न ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, स्वामी चैतन्यानंद बाबा विद्यार्थिनींना इतके अश्लील प्रश्न विचारायचा की अनेक मुली हे प्रश्न ऐकून घाबरून जायच्या. अश्लीलतेची सीमा ओलांडत बाबा विद्यार्थिनींशी त्यांच्या खासगी संबंधांबद्दलही बोलायचा. चला, तुम्हाला त्या 10 प्रश्नांबद्दल सांगतो, जे ‘दिल्लीचा राक्षस’ बाबा कॉलेजच्या मुलींना विचारायचा…
1. तू तुझ्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स केलं आहे का?
2. तू कंडोम वापरतेस का?
3. तुझं आंघोळीचं रुटीन काय आहे?
4. तू माझ्यासोबत परदेशी प्रवासाला येशील का?
5. तुझा बॉयफ्रेंड आहे, म्हणून तू चारित्र्यहीन आहेस!
6. बेबी, आय लव्ह यू अँड आय अॅडोर यू (मला तू खूप आवडतेस)
7. तू माझ्या क्वार्टरमध्ये येऊ शकतेस का?
8. होळीच्या दिवशी रांगेत उभं राहून बाबाकडून रंग लावून घ्यावा लागायचा.
9. लैंगिक प्रस्ताव नाकारल्यास विद्यार्थिनींना धमकी दिली जायची.
10. व्हॉट्सअॅपवर चैतन्यानंद सरस्वती अश्लील मेसेज पाठवायचा.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च (SRISIIM) मॅनेजमेंट कॉलेजच्या 32 विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यानंदविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी 17 विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार केली आहे. या विद्यार्थिनींनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, स्वामी त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा आणि चुकीच्या कृत्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकायचा. तक्रारीनंतर हा दिल्लीचा बाबा फरार आहे. पोलिसांची अनेक पथकं त्याचा शोध घेत आहेत.
अपयशी ठरवण्याची धमकी
तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, SRISIIM च्या पीडित विद्यार्थिनींच्या मोबाइलमधून बाबाचे अश्लील चॅट्सही सापडले आहेत. चॅट्समध्ये लिहिलं आहे की, माझ्या खोलीत ये, मी तुला परदेशी सहलीला घेऊन जाईन, तुला कोणताही खर्च करावा लागणार नाही. विद्यार्थिनींचा आरोप आहे की, जर एखादी मुलगी त्याचं ऐकत नसेल तर तो तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी द्यायचा. पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, विद्यार्थिनींचे मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासासाठी पाठवले आहेत. विद्यार्थिनींनी तक्रारीत सांगितलं की, आरोपीच्या सांगण्यावरून तीन महिला त्यांच्या मोबाइलमधून चॅट्स जबरदस्तीने डिलीट करायच्या.
