#HappyRepublicDay26 सोशल मीडियावर देशभक्तीचा रंग! प्रजासत्ताक दिनी शुभेच्छांचा वर्षाव

रचना भोंडवे, Tv9 मराठी

Updated on: Jan 26, 2023 | 10:59 AM

#HappyRepublicDay26 ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. सोशल मीडिया युजर्स ट्विटरवर एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

#HappyRepublicDay26 सोशल मीडियावर देशभक्तीचा रंग! प्रजासत्ताक दिनी शुभेच्छांचा वर्षाव
74th republic day
Image Credit source: Social Media

यंदा आपण 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. हा प्रजासत्ताक दिन भारतीय जनतेसाठी खूप खास असणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी जे घडणार आहे, ते आजतागायत घडलेले नाही. देशाच्या या गौरवशाली प्रसंगी पहिल्यांदाच 10 देशांचे प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सादर केले आणि आजच्याच दिवशी 1950 मध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती, संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान संमत केले.

दरवर्षी 26 जानेवारीला भारतातील प्रत्येक नागरिक प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करतो. देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोशल मीडियावरही देशभक्तीच्या भावनेने गजबजलेली आहे. #HappyRepublicDay26 ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. सोशल मीडिया युजर्स ट्विटरवर एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI