VIDEO: 2 वर्षांच्या लहानगीवर माकडाने केला हल्ला, पाय पकडून जमिनीवर आपडले, मुलीचं ओरडणं ऐकून आई आली धावून आणि…

| Updated on: Jul 24, 2022 | 2:13 PM

या दाम्पत्याने मिळून माकडाला या लहानगीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले, तरीही हे माकड त्यांना चकवा देत मुलीच्या अंगावर उडी घेत राहिले. माकडाला तिथून घालवण्यासाठी या मुलीच्या वडिलांनी त्याला लाथा मारण्याचाही प्रयत्न केला

VIDEO: 2 वर्षांच्या लहानगीवर माकडाने केला हल्ला, पाय पकडून जमिनीवर आपडले, मुलीचं ओरडणं ऐकून आई आली धावून आणि...
दोन वर्षांच्या लहानगीवर माकडाचा हल्ला
Image Credit source: social media
Follow us on

मॉस्को – आपल्या घराबाहेर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या लहानगीवर (2 years old girl) माकडाने अचानक हल्ला (attacked by monkey)केल्या घटना घडली आहे. रशियाच्या (Russia)टेरपीगोरिएओ या गावात झालेली ही घटना व्हिडीओतही कैद झाली आहे. या माकडाने दोन वर्षांच्या मुलीला खाली पाडले आणि तिच्या अंगावर पंजे मारण्यास त्याने सुरुवात केली. माकडाच्या झालेल्या अचानक हल्ल्याने ही लहान मुलगी चांगलीच घाबरली आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिच्या किंचाळ्या ऐकून आई धावत घराबाहेर आली आणि तिने मुलीला आपल्या कडेवर उचलले. आईने कडेवर घेतल्यानंतरही हे माकड या मुलीवर झेप घेत होता. हा सगळा गोँधळ ऐकून या मुलीचे वडीलही घराबाहेर आले. या दाम्पत्याने मिळून माकडाला या लहानगीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले, तरीही हे माकड त्यांना चकवा देत मुलीच्या अंगावर उडी घेत राहिले. माकडाला तिथून घालवण्यासाठी या मुलीच्या वडिलांनी त्याला लाथा मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र तरीही या व्हिडीओच्या अखेरपर्यंत हे माकड त्या मुलीच्या अंगावर सातत्याने उड्या मारताना दिसते आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

हल्ल्यात दोन वर्षांची मुलगी जखमी

या लहान मुलीचे नाव पॉलिनो असल्याचे सांगण्यात येते आहे. ही मुलगी आणि तिचे पालक हे मूळचे युक्रेनचे रहिवासी आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, हे कुटुंब रशियात आपल्या एका मित्राच्या घरी राहत आहेत. माकडाने केलेल्या या हल्ल्यात पॉलिनो हिच्या हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला आता जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे असेही परिणाम युक्रेनवासियांना भोगावे लागत आहेत. या मुलीवर झालेल्या हल्ल्याबद्दल त्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.

माकडांच्या हल्ल्यांपासून सावधान

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक जण सहलीला जात आहेत. अनेक पर्यंटन स्थळांवर, गडांवर आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही माकडेही आता माणसांना धटावलेली असल्याने ती माणसांच्या अंगावर धावून येतात. त्यांच्याकडील बॅगा आणि पिशव्या पळवण्याचेही प्रयत्न माकडांपासून होत असतात. अशा स्थितीत या माकडांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. रशियातील या व्हिडीओच्या निमित्ताने हाही मुद्दा ऐरणीवर आला आहे.