AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला सर्वात लहान लाकडी चमचा बनविला, गिनिज बुकाने झाली नोंद

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाईटने या विक्रमाची नोंद घेतली आहे. हा चमचा एका स्टॅंडर्ड वुडन स्पूनची प्रतिकृती आहे, त्यामुळे तो हाताने कोरुन  बनविला असल्याचे स्पष्ट असल्याचे गिनिज बुकने म्हटले आहे.

जगातला सर्वात लहान लाकडी चमचा बनविला, गिनिज बुकाने झाली नोंद
WOODEN SPOONImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 19, 2023 | 7:19 PM
Share

बिहार | 23 ऑगस्ट 2023 : बिहारमधील एका 25 वर्षीय तरुणाने अवघा 1.6 एमएम ( 0.06 इंच ) आकाराचा चमचा बनवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. शशिकांत प्रजापती या मायक्रो आर्टीस्टने हा अनोखा चमचा एकाच लाकडापासून कोरुन बनविला असून आहे. या विक्रमामुळे नवरतन प्रजापती मूर्तीकार यांनी ( 2 एमएम – 0.07 इंच ) 2022 मध्ये बनविलेल्या सर्वात छोट्या चमच्याचा विक्रम मोडला गेला आहे. साल 2015 मध्ये कॉलेज पहिल्या वर्षाला असताना प्रजापती याने पहिल्यांदा कलाकुसरीस प्रारंभ केला होता.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाईटने या विक्रमाची नोंद घेतली आहे. हा चमचा एका स्टॅंडर्ड वुडन स्पूनची प्रतिकृती आहे, त्यामुळे तो हाताने कोरुन  बनविला असल्याचे स्पष्ट असल्याचे गिनिज बुकने म्हटले आहे. मायक्रो आर्टीस्ट शशिकांत प्रजापती हा सर्वात लहान लाकडी चमचा तयाक करण्याचे तंत्र आत्मसात करण्यासाठी खूप सराव केला आणि आधीचा विक्रम मोडण्यासाठी आणि योग्य डिझाइन होण्यासाठी 10 पेक्षा जास्त चमचे लाकडातून कोरल्याचे म्हटले जात आहे. प्रजापती आपल्या नव्या मायक्रो आर्ट्स कलेबद्दल खूपच पॅशनेट असून या विक्रमामुळे या कलेला जागतिक ओळख मिळेल असे त्याला वाटते. साल 2015 मध्ये कॉलेज पहिल्या वर्षाला असताना प्रजापती याने पहिल्यांदा कलाकुसरीस प्रारंभ केला होता.

गिनिज बुकात झाली नोंद –

चार वेळा विक्रम मोडला गेलाय

लाकडापासून चमचा बनविणे तसे सोपे आहे. परंतू जगातील सर्वात छोटा चमचा बनविणे ही अवघड कामगिरी होती असे प्रजापती याने म्हटले आहे. विषेश म्हणजे या रेकॉर्डसाठी अनेक लाकडांना जोडून चमचा तयार करण्याची परवानगी असतानाही शशिकांत प्रजापती याने एकाच लाकडाला क्राफ्ट चाकू आणि सर्जिकल ब्लेड वापरुन कोरून हा चमचा तयार केला आहे. नवीन रेकॉर्ड तयार करण्यासाठी 1.6 एमएम आकार गाठल्याने शशिकांत प्रजापती याचा विजय झाला आहे. भारतीय तरुण आपल्याच सहकाऱ्याचे आधीचे विक्रम मोडत नवीन स्वत:चे विक्रम करीत आहेत. तीन वर्षात चार वेळा हा विक्रम मोडला असल्याचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड यांनी ट्वीटर म्हटले आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.